Omicron Variant : नव्या कोरोना व्हेरीयंटमुळे राज्यात पुन्हा ब्रेक?

एमपीसी न्यूज – कोरोना संकट निवळल्याने राज्यभरात अनलाॅक प्रक्रिया टप्प्या टप्याने सुरू करण्यात आली होती. मात्र नविन कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा निर्बंध लागू करणार का, अशी स्थिती निर्माण झाली आहे. याच अनुशंघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (दि.28) सर्व विभागांची बैठक घेणार आहेत. 

इतर निर्बंधांमध्ये शिथिलता देत राज्य सरकारने 1 डिसेंबर पासून पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नुकताच घेतला होता. दरम्यान पुण्यात पूर्ण क्षमतेनं सिनेमागृह सुरू करण्याची तयारी सुद्धा दर्शवली होती. मात्र, नव्या व्हेरीयंटच्या धोक्यामुळे या निर्णयावर राज्य सरकार नेमकी काय भुमिका बजावणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

दरम्यान, राज्य सरकारनं ओमिक्राॅनचा धोका आधीच ओळखून राज्यात नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. लसीकरणावर जोर देत त्याविषयी कडक धोरण अवलंबले आहे. दुकानं, माॅल्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दोन डोस असणाऱ्यांनाच परवानगी देण्यात आली आहे, शिवाय बस, टॅक्सी, ट्रेन किंवा अन्य वाहतूकीतून प्रवास करण्यासाठी सुद्धा दोन डोस असणाऱ्यांनाच मुभा देण्यात आली आहे.

निर्बंध शिथीलीकरणाबाबत आज नेमका काय निर्णय घेणार, आज कशी होणार घडामोड…. पहा सविस्तर

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.