Maharashtra News : मोठी बातमी; वन विभागामध्ये वनरक्षकांची भरती प्रक्रिया सुरु

एमपीसी न्यूज – वनविभागातील वनरक्षक (गट क) पदे सरळसेवेने (Maharashtra News) भरण्याची प्रक्रिया दिनांक 10 जून 2023 पासून सुरु होत आहे. महाराष्ट्र वन विभागाच्या www.mahaforest.gov.in या लिंकवर जाहिरात तसेच  भरतीचा फॉर्म उपलब्ध आहे. त्यावर जाऊन उमेदवारांनी माहिती भरावी व स्वतःचे नाव नोंदवावे. ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत ही 10 जून २०२३ ते 30 जून अशी आहे.

वनरक्षकासाठी 2138 पदे उपलब्ध असून हि साधारण एक मेगा भारतीच आहे. स्वतःची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, शारीरिक पात्रता, हे निकषात बसतात का बघूनच अर्ज करावा असे वनविभागाची विनंती आहे. परीक्षा शुल्कची किंमत अमागास लोकांना 2000 रुपये असणार आहे तर मागासवर्गीय व अनाथ लोकांना केवळ 900 रुपये असणार आहे. माजी सैनिकास परीक्षा शुल्कासाठी एकही रुपया घेतला जाणार नाहीये. उमेदवार हे फक्त एकाच फॉर्म भरू शकतात व एक पेक्षा जास्त भरल्यास बाकीचे फॉर्म रद्द केले जातील.

ऑनलाईन लेखी परीक्षेमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या सर्वाना प्रत्येकी 30 गुण असणार आहेत. पुरुष उमेदवारास 5 किमी धावण्याची चाचणी घेण्यात येईल तर महिला उमेदवारास 3 किमी धावण्याची चाचणी घेतली जाईल. खेळाडू उमेदवार, माजी सैनिक आणि वनरक्षकांच्या पाल्याना काही सवलती दिली जातील.

वनरक्षक पदांची वनवृत्त निहाय विभागणी – Maharashtra News 

पुणे 64
नागपूर 277
चंद्रपूर 111
गडचिरोली 49
अमरावती 20
यवतमाळ 55
औरंगाबाद 73
धुळे 51
नाशिक 41
ठाणे 266
कोल्हापूर 249

Talegaon Dabhade : तळेगाव येथे मोदी @9 कार्यक्रमाचे आयोजन

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.