Maharashtra News : राज्यात बर्ड फ्लूने 160 पक्ष्यांचा संशयितरित्या मृत्यू

एमपीसी न्यूज – बर्ड फ्लू राेगाचा प्रार्दुभाव हिमाचल प्रदेश, राजस्थान, केरळ आणि मध्यप्रदेश या राज्यात स्थलांतरित पक्ष्यांत आढळून आला आहे. महाराष्ट्रात परभणी, लातूर, नाशिक, नागपूर आणि अमरावती या पाच जिल्ह्यात 160 पक्ष्यांचे संशयितरित्या मृत्यू झाले आहेत. सदर मृत पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी भाेपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुराेग संस्थेच्या प्रयाेगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

कुक्कुट पक्ष्यात परभणी जिल्ह्यात 43, लातूर जिल्ह्यात 40, नागपूर जिल्ह्यात 50 पाेपट, अमरावती जिल्ह्यात एक घुबड व 29 परसातल्या काेंबड्या, नाशिक जिल्ह्यात एक चिमणी व एक भारद्वाज असे एकूण 160 पक्षांचे मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. त्यांच्या तपासणीचे निष्कर्ष हाती येण्यास अद्याप दाेन ते तीन दिवसांचा कालावधी लागेल असे राज्याचे पशुसंर्वधन विभागाने स्पष्ट केले आहे. आठ जानेवारी पासून आतापर्यंत एकूण 1205 विविध पक्ष्यांच्या मृत्यूची नाेंद झालेली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पूर्वी पाठवलेल्या नमुन्यांचे तपासणीचे निष्कर्ष भाेपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुराेग संस्थेकडून प्राप्त झाले आहे. त्यानुसार मुंबई, घाेडबंदर (ठाणे) व दापाेली याठिकाणचे कावळे, बगळे तसेच परभणी जिल्ह्यातील मुरंबा याठिकाणचे पाेल्ट्री फार्म मधील नमुने हायला पॅथोजेनिक एव्हीयन इन्फ्ल्युएन्झा (एच 5 एन 1) आणि बीड येथील (एच 5 एन 8) नमुने पाॅझीटिव्ह आले आहे. त्याअनुषंगाने सदर क्षेत्रास ‘संसर्गग्रस्त क्षेत्र’ घाेषित करण्यात आले आहे.

त्याठिकाणी सुरक्षित खबरदारीचे अनुषंगाने प्रतिबंधक आदेश लागू करण्यात आले आहे. त्यानुसार परभणी जिल्ह्यातील मुरुंबा याठिकाणच्या ज्या पाेल्ट्री फार्म मध्ये बर्डफ्लूचा प्रार्दुभाव आढळून आला आहे. त्या पाेल्ट्री फार्मपासून एक किमी त्रिज्येच्या अंतरात येणारे सर्व काेंबड्या नष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर मुंबई, घाेडबंदर (ठाणे) , दापाेली, बीड येथे केवळ सर्वेक्षण सुरु ठेवण्यात येणार आहे.

राज्यातील काेणत्याही गावात कावळे, पाेपट, बगळे किंवा स्थलांतरित हाेणारे पक्षी मृत आढळून आल्यास किंवा पाेल्ट्री व्यवसायिकांना नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात पक्षी मृत आढळून आल्याचे दिसल्यास त्यांनी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात माहिती द्यावी असे आवाहन पशुसंर्वधन विभागाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.