Maharashtra News : संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज- उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Maharashtra News)  यांना लॉरेन्स बिष्णोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भात संजय राऊतांनी पोलिसांना माहिती दिली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

 

Maharashtra News : व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 92 रुपयांची कपात पण घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल नाही

 

संजय राऊत यांना काल रात्री  त्यांच्या मोबाईलवर एक टेक्स्ट मेसेज आला. हिंदू विरोधी. मार दूँगा तुझे. दिल्ली में मिल तू एके 47 से उडा दूँगा. मुसेवाला टाईप. लॉरेन्स के और से मेसेज है. सोच ले XX सलमान और तू फिक्स, अशी धमकी या टेक्स्ट मेसेजमधून देण्यात आली आहे. ही धमकी आल्यानंतर संजय राऊत यांनी तात्काळ मुंबईचे पोलीस आयुक्त आणि विशेष आयुक्त यांना (Maharashtra News)  माहिती दिली आहे.

या मेसेज नंतर पोलिसांनी तात्काळ संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.