Maharashtra News : ख्यातनाम साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांचा सत्कार

एमपीसी न्यूज – ख्यातनाम मराठी साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांना राष्ट्रीय स्तरावरचा, के. के. बिर्ला फाउंडेशनचा, “सरस्वती सन्मान” पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. यानिमित्ताने साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी आज त्यांचा सत्कार केला.

निंबाळे यांची 40 पुस्तके प्रकाशित असून, त्यांचे विविधांगी लेखन आहे. त्यांच्या ‘सनातन’ या कादंबरीला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या कादंबरीतून स्वातंत्र्य चळवळीतील दलित व आदिवासी समाजाचे योगदान त्यांनी अधोरेखित केले आहे.

साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी निंबाळे यांची भेट घेऊन त्यांचा अभिनंदनपर सत्कार केला. त्यामध्ये साहित्य परिषदेचे कार्यवाह माधव राजगुरू, अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे कोषाध्यक्ष डॉ. दिलीप गरुड, अक्षरभारतीचे कार्याध्यक्ष श्रीकांत चौगुले यांचा यामध्ये समावेश आहे.

देशातील 22 भाषांमधून मराठी भाषेतील ‘सनातन’ या कादंबरीची निवड केली असून, सन्मानपत्र व पंधरा लाख रुपये रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.