Maharashtra News : महाराष्ट्र परदेशी गुंतवणुकीत पुन्हा नंबर एकवर-देवेंद्र फडणवीस
ऊर्जा क्षेत्रात दोन बड्या कंपन्यांसोबत सामंजस्य करार

एमपीसी न्यूज- राज्य सरकारने अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रात दोन बड्या कंपन्यांसोबत (Maharashtra News) एक मोठा करार केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल माहिती दिली . राज्यातील विजेची वाढती मागणी लक्षात घेत राज्य सरकारने येत्या काळात 13 हजार 50मेगावॉट विजेच्या निर्मितीसाठी नॅशनल हायड्रो पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचपीसी) तसेच टोरंट पॉवर लिमिटेड या दोन कंपन्यांशी सोमवारी हा सामंजस्य केला.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सामंजस्य कराराच्या वेळी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक पी.अनबलगन, स्वतंत्र संचालक विश्वास पाठक, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ श्रीकर परदेशी तसेच एनएचपीसीचे संचालक विश्वजित बसू, टोरंट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिनल मेहता आदी उपस्थित होते.
Pune : मेट्रोचे साहित्य चोरणाऱ्यांना अटक
महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणुक येत आहे.विरोधक उद्योग इकडे-तिकेडे गेले असे म्हणत होते ,आता तर महाराष्ट्र परदेशी गुंतवणुकीत पुन्हा नंबर एकवर आला आहे. आता विरोधकांनी तोंडं बंद केली पाहिजेत, अशा शब्दात त्यांनी विरोधकांना टोला लगावला (Maharashtra News) .