Maharashtra News : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीत महाविकास आघाडीची बाजी

एमपीसी न्यूज- विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणूकांचे निकाल काल (दि. 2 ) जाहीर झाले. या निवडणूकीत महाविकास आघाडीने 3 जागा मिळवत चांगलीच बाजी (Maharashtra News) मारलेली आहे.

नाशिक पदवीधर मतदार संघातून अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे 29,465 मतांनी व अमरावती पदवीधर मतदार संघातून महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे हे विजयी झाले आहेत. तर शिक्षक मतदार संघाच्या नागपूर विभागात  महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले 16,700 मतांनी, कोकण विभागात बाळासाहेबांची शिवसेनाचे ज्ञानेश्वर म्हात्रे 20,683 मतांनी  व औरंगाबाद विभागात महाविकास आघाडीचे विक्रम काळे 6,937 मतांनी  विजयी झाले आहेत.

Pune Crime News : सराईत गुन्हेगार टोळीवर मोका

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.