Maharashtra News : एमबीबीएस शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना केंद्र सरकारचा दिलासा

एमपीसी न्यूज – सन 2019-20 मध्ये एमबीबीएसचे प्रथम शैक्षणिक वर्षातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता पाचव्या वेळेस परीक्षा देण्याची संधी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) उपलब्ध करून दिली (Maharashtra News) आहे.
2019-20 या काळात प्रथम वर्ष एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री डॅा.भारती पवार यांना भेटून यासंदर्भात विनंती केली होती. कोविड विषयक तत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन पवार यांनी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे (NMC) पाठपुरावा व केंद्रीय स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी या बाबत विस्तृत चर्चा करून या विद्यार्थ्यांना पाचव्या वेळेस परीक्षा देण्याची संधी निर्माण करून दिली आहे.