Maharashtra News : काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले

एमपीसी न्यूज – काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदाचा नाना पटोले यांनी कालच राजीनामा दिला होता. त्यानंतर अवघ्या 24 तासात नाना पटोले यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. नाना पटोले यांनी बुधवारी राहुल गांधी यांची भेट घेतली होती.

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी काल अखेर विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे त्यांनी सुपुर्द केला होता. गेल्या काही दिवसांपासून पटोले यांचे नाव महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत होतं. त्यावर हायकमांडने अखेर शिक्कामोर्तब केल्यानंतर पटोले यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर आज नाना पटोले यांच्या नावाची आज घोषणा झाली.

कार्यकारी अध्यक्ष
1. शिवाजी मोघे (यवतमाळ)
2. बस्वराज पाटील (उस्मानाबाद)
3. नसीम खान (मुंबई)
4. कुणाल पाटील (धुळे)
5. चंद्रकांत हंडोरे (मुंबई)
6. प्रणिती शिंदे (सोलापूर)

काँग्रेसचे 10 नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष
1. शिरीष चौधरी (जळगाव)
2. रमेश बागवे (पुणे)
3. हुसैन दलवाई (मुंबई)
4. मोहन जोशी (पुणे)
5. रणजीत कांबळे (वर्धा)
6. कैलाश गोरंट्याल (औरंगाबाद)
7. बी. आय. नगराळे
8. शरद अहेर (नाशिक)
9. एम. एम. शेख (औरंगाबाद)
10. माणिकराव जगताप (रायगड)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.