Maharashtra News : डिलीव्हरी बॉईजसाठी कायदे किंवा मंडळे स्थापण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेलची मागणी

एमपीसी न्यूज: राज्यातील तरुण वर्ग लाखोंच्या संख्येने डिलीव्हरी बॉईज म्हणून स्विगीसारख्या कंपनीत काम करत आहेत. या कामगारांचे शोषण होत असून त्यांना मिळणारे दाम हे अत्यंत कमी असून त्यांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा देण्यात येत नाही. या कामगार वर्गासाठी राज्यात नवीन कायदा आणि कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात यावे, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेलने काल राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांना केली आहे.

यावेळेस कामगार मंत्र्यांनी हा विषय लवकरात लवकर मार्गी लावू असे आश्वासन दिले आहे.

_MPC_DIR_MPU_II

कामगारांनी मिळणारे दाम वाढवण्यासाठी कंपनीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता कामगारांना कामावरून कमी करण्यात येत आहे. तसेच कुठल्याही प्रकारचे आंदोलन केल्यास या कामगारांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत असल्याच्या घटना राज्यात निदर्शनास येत आहेत. स्विगीसारख्या कंपन्यांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. या डिलीव्हरी बॉईज म्हणून काम करणाऱ्या तरुणांसाठी कोणताही कायदा किंवा मंडळ अस्तित्वात नाही.

देशांत कर्नाटक हे पहिले राज्य आहे, जिथे राज्य सरकार डिलीव्हरी बॉईजसाठी नवीन कामगार कायद्यांची योजना आखत आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टी कामगार सेलचे प्रदेश उपाध्यक्ष जमील हिदायत औटी यांनी दिली.

काल जमील औटी यांनी कामगार मंत्र्यांची भेट घेऊन त्यांना या परिस्थितीची कल्पना दिली आणि या कामगार वर्गासाठी आपल्या राज्यात नवीन कायदा आणि कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात यावे, यासाठी विनंती केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.