Maharashtra News : दहावी-बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

एमपीसी न्यूज : राज्य शिक्षण मंडळाच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. दहावीची परीक्षा ही 29 एप्रिल 2021 ते 31 मे 2021 च्या दरम्यान घेण्यात येणार असून बारावीची परीक्षा 23 एप्रिल 2021 ते 29 मे 2021च्या दरम्यान घेतल्या जाणार आहेत. परीक्षांचा निकाल हा अंदाजे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

दहावीची लेखी परीक्षा ही 29 एप्रिल ते 31 मे च्या दरम्यान होणार असून प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा या 28 मे ते 3 जूनच्या दरम्यान होणार आहेत. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण विषयाची परीक्षा ही 28 मे ते 9 जूनच्या दरम्यान होणार असल्याची माहिती राज्य शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

बारावीची लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 29 मेच्या दरम्यान होणार आहे. माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञानाची परीक्षा 27 मे ते 05 जूनच्या दरम्यान ऑनलाईन होणार आहे. तसेच प्रात्यक्षिक, तोंडी इत्यादी 27 मे ते 2 जूनच्या दरम्यान पार पडणार आहेत.

याचबरोबर त्यांनी इयत्ता नववी ते बारावीच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती दिवसेंदिवस वाढत असल्याचे सांगितले. सध्या 21,287 शाळा सुरू असून 76.8 टक्के विद्यार्थी शाळांमध्ये येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.