Maharashtra News : …. तर त्यावरून पुण्यात आंदोलन करायचे काय कारण आहे – शरद पवार

एमपीसी न्यूज – गेल्या काही दिवसांत दंगलीसदृश्य (Maharashtra News) घटना घडल्या. मात्र, या घटना त्या-त्या परिसरातच मर्यादित राहिल्या. ही चांगली गोष्ट आहे. मात्र, हे जाणूनबुजून घडवले जात आहे. उदाहरणच घ्यायचे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणीतरी औरंगजेबाचा फोटो दाखवला. तर, त्यावरून पुण्यात आंदोलन करायचे काय कारण आहे? असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. ते आज (बुधवारी, दि. 7) छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

शरद पवार म्हणाले, “राज्यात संगमनेर व कोल्हापूर येथे पुन्हा सामाजिक तणावाच्या घटना घडल्या. कोल्हापूर येथील आंदोलनाची बातमी टिव्हीवर पाहिली. कोणीतरी मोबाईलवर मेसेज पाठवतो. त्यावरुन लगेच रस्त्यावर उतरुन अशा घटनेला धार्मिक स्वरुप देणे योग्य नाही. सत्ताधाऱ्यांनी अशा गोष्टीला प्रोत्साहित करणे योग्य नाही. राज्यात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे. पण जर राज्य सरकारच या प्रकरणात लोकांना उचकवू लागले आणि दोन समाजात, दोन जातींमध्ये कटुता निर्माण करू लागले तर हे काही चांगले लक्षण नाही.

India News : गांधीजींच्या सत्याग्रहाच्या 130 व्या वर्षपूर्ती निमित्त दक्षिण आफ्रिकेतील विशेष कार्यक्रमात भारतीय नौदल होणार सहभागी

गेल्या काही दिवसांत दंगलीसदृश्य घटना घडल्या. मात्र, या घटना त्या-त्या परिसरातच मर्यादित राहिल्या. ही चांगली गोष्ट आहे. मात्र, हे जाणूनबुजून घडवले जात आहे. उदाहरणच घ्यायचे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणीतरी औरंगजेबाचा फोटो दाखवला. तर, त्यावरून पुण्यात आंदोलन करायचे काय कारण आहे?

ओडिशा आणि काही राज्यात चर्चवर हल्ले केले जात आहेत. ख्रिश्चन समाज हा शांतताप्रिय आहे. कोणाची काही चूक असेल तर सरकारने पोलिस कारवाई करावी. मात्र तसे न करता चर्चवर हल्ले केले जात आहेत. हे एकट्या-दुकट्याचे काम नाही. ही एक विशिष्ट विचारसरणी (Maharashtra News) आहे. ही विचारधारा समाजाच्या हिताची नाही, असेही पवार म्हणाले.

https://twitter.com/PawarSpeaks/status/1666350088531345409?s=20

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.