Maharashtra News : प्रत्येक जिल्ह्यात स्पेशल ज्युवेनाईल पोलीस युनिट अधिक सक्रीय असावे

एमपीसी न्यूज – प्रत्येक जिल्ह्यामधील स्पेशल ज्युवेनाईल पोलीस युनिट (SJPU) हे जास्तीत जास्त सक्रिय व अद्ययावत असणे आवश्यक आहे, असे मत राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा ॲड. सुशीबेन शाह (Maharashtra News)यांनी व्यक्त केले.
महिला, बाल अत्याचार, प्रतिबंध विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दीपक पांडे यांची अध्यक्षा ॲड. सुशीबेन शाह यांनी भेट घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आयोगाच्या सदस्य ॲड. निलिया चव्हाण उपस्थित होत्या.
Metro News : मेट्रोची ‘ती’ स्थानके सुरक्षित; सीओईपी कडून महामेट्रोकडे ऑडीटचा अहवाल सादर
ॲड. सुशीबेन शाह म्हणाल्या की, मुली व महिला बेपत्ता होण्याच्या घटना होऊ नये म्हणून प्रत्येक जिल्ह्यामधील स्पेशल ज्युवेनाईल पोलीस युनिट (SJPU) हे जास्तीत जास्त सक्रिय व अद्ययावत असणे आवश्यक आहे. लहान मुली आणि महिलांमध्ये जनजागृती होण्यासाठी आयोगाने माहितीपर पोस्टर्स तयार केलेले असून, हे पोस्टर सर्व पोलीस स्थानकात लावण्यासाठी त्याची प्रत आयोगामार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक यांना देण्यात आली.
विशेष पोलीस महानिरीक्षक दीपक पांडे म्हणाले की, या विषयाबाबत सविस्तर अहवाल ते आयोगास सादर करतील. आयोगातील पोलीस विभागाशी संबंधित सर्व प्रकरणे विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयामार्फत प्राधान्याने निकाली काढण्यासाठी (Maharashtra News ) प्रयत्न केले जातील.”