Maharashtra News : दारिद्र्यरेषेवरील विद्यार्थ्यांनाही मिळणार दोन गणवेशांचा लाभ

एमपीसी न्यूज – शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Maharashtra News) शाळांमध्ये पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती तसेच दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांना दोन गणवेशांचा लाभ शासनाकडून देण्यात येत होता. सन 2023 – 24 या शैक्षणिक वर्षापासून दारिद्र्यरेषेवरील विद्यार्थ्यांना देखील दोन गणवेशांचा लाभ शासनाकडून देण्यात येणार आहे.

केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येत असलेल्या मोफत गणवेश योजनेंतर्गत हा लाभ विद्यार्थ्यांना दिला जातो. या योजनेंतर्गत केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये पहिली ते आठवी मध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमातीमधील मुले तसेच दारिद्र्य रेषेखालील पालकांची मुले यांना दोन गणवेशाचा लाभ देण्यात येतो. तसेच, वरील शाळांमधील दारिद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांना देखील सन 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

Hadapsar : सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून जावयाने गळफास घेऊन केली आत्महत्या

समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत केवळ सन 2023-24 या शैक्षणिक वर्षापुरता एका गणवेशाचा लाभ पुर्वीप्रमाणेच शाळा व्यवस्थापन समितीमार्फत देण्यात येणार आहे. तसेच, उर्वरित एका गणवेशाचा लाभ शासनामार्फत या शैक्षणिक वर्षामध्ये देण्यात येणार आहे.

या योजनेंतर्गत यापुढे राज्यातील सर्व पात्र विद्यार्थ्यांना एकसमान एकरंगाचा दर्जेदार गणवेशाचा लाभ देण्याच्या दृष्टीने शाळा व्यवस्थापन समितीस शासनामार्फत गणवेशाचे कापड उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत नोंदणीकृत असलेल्या जवळच्या महिला बचत गट / संस्था यांच्याकडून तसेच, नजीकच्या ठिकाणी बचत गट नसेल तर स्थानिक शिवणदारांकडून शाळा व्यवस्थापन समिती गणवेश शिलाई करून दोन गणवेश विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देणार आहे. गणवेशाच्या शिलाईचा खर्च शाळा व्यवस्थापन समितीस शासनामार्फत उपलब्ध करुन देण्यात येणार (Maharashtra News) आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.