Maharashtra News : आज सुटणार सत्तासंघर्षाचा पेच….

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यापासून आणि एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर दावा सांगितल्यापासून हा ठाकरे विरूद्ध शिंदे हा संघर्ष सुप्रीम कोर्टात (Maharashtra News ) पोहचला आहे. याआधीही अनेकदा तारीख मिळूनही कोर्टाकडून कोणताही ठोस निर्णय मिळाला नाही. त्यानंतर आजच्या तारखेकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.सकाळी साडे दहा वाजता सुनावणी होणार आहे.

 

 

Pune News : डेक्कन व चतु:श्रुंगी वाहतूक विभागाअंतर्गत वाहतूक, पार्कींग व्यवस्थेत बदल

ही सत्तासंघर्षाची सुनावणी आता आज (14 फेब्रुवारी)पासून सलग घेतली जाईल .सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शाह, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा यांच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे या याचिकांवर सुनावणी सुरू आहे.

7 सदस्यीय घटनापीठ स्थापन करण्यात यावं अशी मागणीदेखील उद्धव ठाकरे यांनी केली होती.या सुनावणी दरम्यान हे प्रकरण सात सदस्यीय घटनापीठाकडे सुनावणीसाठी सोपवायचे की नाही, यासंदर्भात देखील निर्णय घेतला जाऊ शकतो.

या महत्वपूर्ण सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष (Maharashtra News )लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.