Maharashtra News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर

एमपीसी न्यूज – केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांचा (Maharashtra News) दोन दिवसांचा महाराष्ट्र दौरा आहे. मंत्री अमित शाह यांचे शनिवारी (दिं15) सायंकाळी मुंबई येथे आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, श्रीमती पूनम महाजन, आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, नितेश राणे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, राजशिष्टाचार विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Khopoli Accident : बस अपघात प्रकरणात घडले माणुसकी अन संवेदनशीलतेचे दर्शन

राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी (दि. 16) मंत्री अमित शाह यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. नवी मुंबईतील खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर हा सोहळा होणार आहे.

पुरस्कार सोहळ्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा अमित शाह आढावा घेणार आहेत. त्यामुळे राज्यातील भविष्यातील राजकीय समीकरणे काय असतील याची पायाभरणी अमित शाह यांच्या (Maharashtra News) या दौऱ्यामध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.