Maharashtra Omicron: महाराष्ट्रात ओमायक्रोन रुग्णांची  संख्या सतराशे पार

एमपीसी न्यूज:  राज्यात एकूण 1730  ओमायक्रॉन विषाणूबाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी 879 रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

यातील 26 रुग्ण हे इतर राज्यातील, तर प्रत्येकी 1 रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई, नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. 7 रुग्ण ठाणे आणि 4 रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. 9 रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.

72 नमुन्यांचा अद्याप प्रलंबित आतापर्यंत 4792 प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी 72 नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

नागपूर- 39
मुंबई- 24
मीरा-भाईंदर- 20,
पुणे मनपा – 11
अमरावती- 9
अकोला- 5
पिंपरी-चिंचवड 3
औरंगाबाद, जालना, पुणे ग्रामीण आणि अहमदनगर –
प्रत्येकी 2
नाशिक, कोल्हापूर, लातूर, सातारा, ठाणे मनपा आणि वर्धा- प्रत्येकी 1 रुग्ण

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.