Maharashtra : क्षमता नसणारे लोक ‘क’ पदार्थ बुद्धिमत्ता असणारे – सुषमा अंधारे

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट अणि भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर टीका

एमपीसी न्यूज : शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट आणि (Maharashtra) भाजपचे आमदार नितेश राणे हे ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत याच्यावर सतत टीका करतात. त्याबाबत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, संजय राऊत साहेबांना का बर सर्वजण घेरून असतात? त्याबद्दल हेवा वाटायचा, ईर्षा वाटायची की, संजय राऊत यांनाच सगळे घेरतात.

जो तो उठतो आणि संजय राऊत यांच्यावर टीका करतो. या सर्व गोष्टींचा अर्थ असा की, छातीचा कोट करून संजय राऊत शिवसेनेसाठी लढत आहे. आता मला देखील काहीजण घेरण्याचा प्रयत्न करत असतात.

Wakad : घड्याळाचा सेल बदलण्यासाठी आलेल्या ग्राहकास बेदम मारहाण

त्यातून एकच वाटत की, आपण देखील काही तरी पक्षासाठी योगदान देत आहे. याबद्दल मनामध्ये समाधानाची भावना येते. तसेच संजय राऊत यांच्याबद्दल क्षमता नसणारे लोक ‘क’ पदार्थ बुद्धिमत्ता असणारे, सुमार बुद्धय़ांक असणारे लोक अशा शब्दात संजय शिरसाट आणि नितेश राणे यांच्यावर सुषमा अंधारे यांनी टीका केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.