Maharashtra Police: कोरोना काळात राज्यात टाळेबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी सव्वा दोन लाख गुन्हे दाखल

राज्यभरात ज्यांच्या हातावर क्वारंटाइन (Quarantine) असा शिक्का आहे, अशा 824 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले.

एमपीसी न्यूज – लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम 188 नुसार 2 लाख 24 हजार 697 गुन्हे दाखल झाले आहेत. 32 हजार 989 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे आणि 19 कोटी 62 लाख 34 हजार 944 रुपये दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित आहे. तसेच फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

राज्यात लॉकडाऊनच्या (दि.22 मार्च ते 8 ऑगस्ट) कालावधीतील महत्वपूर्ण माहिती –

# अत्यावश्यक सेवेसाठी 7 लाख 17 हजार 394 पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत.

# पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – 329 (888 व्यक्ती ताब्यात)

# 100 नंबरवर आलेले फोन – 1 लाख 9 हजार 666

# राज्यभरात ज्यांच्या हातावर क्वारंटाइन (Quarantine) असा शिक्का आहे, अशा 824 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले.

# अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – एक हजार 346

# जप्त केलेली वाहने – 95 हजार 575

# कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेले पोलीस – 115
मुंबईतील 52 पोलीस व 4 अधिकारी अशा एकूण 56, ठाणे शहर 13 व ठाणे ग्रामीण 3 व 1 अधिकारी,

# राज्यातील जिल्ह्यानुसार कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या – रायगड 2, पुणे शहर 3, नाशिक शहर 1, सोलापूर शहर 3, अमरावती शहर 1 डब्ल्यूपीसी, मुंबई रेल्वे 4, नाशिक ग्रामीण 3, जळगाव ग्रामीण 1, जालना एसआरपी 1 अधिकारी, नवी मुंबई एसआरपी अधिकारी 1, पालघर ग्रामीण 2 व 1 अधिकारी, ए.टी.एस. 1, उस्मानाबाद 1, औरंगाबाद शहर – 3, जालना – 1, नवी मुंबई – 2, सातारा – 1, अहमदनगर – 2, औरंगाबाद रेल्वे – 1, एसआरपीएफ अमरावती 1, पुणे रेल्वे अधिकारी – 1, पीटीएस मरोळ अधिकारी – 1, एसआयडी मुंबई – 1, नागपूर – 2, बीड- 1

# सध्या 234 पोलीस अधिकारी व एक हजार 709 पोलीस कोरोनाबाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.