Maharashtra Police: राज्यातील 5713 पोलिसांना कोरोनाची लागण, 4531 झाले बरे; 71 जणांचा मृत्यू

Maharashtra Police: 5713 policemen in the state infected with corona, 4531 recovered; 71 dies लॉकडाऊन लागू झाल्यापासून निषेधाज्ञाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकूण 1,55,984 गुन्हे दाखल झाले आहेत.

एमपीसी न्यूज- महाराष्ट्रात 278 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला असून आतापर्यंत 5713 कर्मचारी कोरोना बाधित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. एका अधिकाऱ्याने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे आतापर्यंत 71 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सर्वाधिक 43 पोलीस मृत्यू पावले आहेत.

मृतांमध्ये दोन अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत 4531 पोलीस बरे झाले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्यात आणखी 278 पोलिसांना बाधा झाल्याने पोलीस दलातील बाधितांची संख्या 5713 झाली आहे. सध्या 1113 पोलिसांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, हे कर्मचारी कधी बाधित झाले, याची माहिती समजू शकलेली नाही.


तत्पूर्वी, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक टि्वट केले होते. त्यांनी म्हटले होते की, कोविड-19 मुळे 5713 पोलीस बाधित झाले आहेत. यापैकी 4531 बरे झाले असून 71 जणांचा मृत्यू झाला आहे.


याचदरम्यान, एका अधिकाऱ्याने सांगितले की, 25 मार्च रोजी लॉकडाऊन लागू झाल्यापासून निषेधाज्ञाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 188 नुसार एकूण 1,55,984 गुन्हे दाखल झाले आहेत. आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 88,783 वाहने जप्त करण्यात आली आणि 11.54 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.