Maharashtra Police: राज्यात कोरोना काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 1 लाख 97 हजार जणांवर गुन्हे दाखल

Maharashtra Police: Crimes registered against 1 lakh 97 thousand people in the state for violating the order during the Corona period राज्यात लॉकडाऊनच्या 22 मार्च ते 20 जुलै या कालावधीत हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

एमपीसी न्यूज – लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम 188 नुसार 1 लाख 97 हजार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच 31 हजार 332 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

राज्यात लॉकडाऊनच्या 22 मार्च ते 20 जुलै या कालावधीत हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना 315 घटना घडल्या असून 881 व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कोरोना काळात पोलिसांना 100 या क्रमांकावर 1 लाख 7 हजार 842 फोन आले. नागरिकांच्या तक्रारी, समस्यांचे पोलिसांकडून निरसन केले जात असल्याचेही गृहमंत्री म्हणाले.

अत्यावश्यक सेवेसाठी 6 लाख 19 हजार 794 पास महाराष्ट्र पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत. राज्यभरात ज्यांच्या हातावर क्वारंटाइन (Quarantine) असा शिक्का आहे, अशा 805 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविण्यात आले आहे. अवैध वाहतूक करणाऱ्या 1 हजार 346 वाहनांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

कोरोनाचा पोलीस दलालाही विळखा –

महाराष्ट्र पोलीस दलातील 199 पोलीस अधिकारी आणि 1 हजार 410 पोलीस कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात 88 पोलीस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडले.

कोरोनाच्या लढाईत मृत्यू झालेल्या पोलिसांची आकडेवारी –
मुंबईतील 47 पोलीस व 4 अधिकारी असे एकूण 51, पुणे 3, सोलापूर शहर 3, नाशिक ग्रामीण 3, नाशिक शहर 1, एटीएस 1, मुंबई रेल्वे 4, ठाणे शहर 7, ठाणे ग्रामीण 2 कर्मचारी, 1 अधिकारी, जळगाव ग्रामीण 1, पालघर 2, रायगड 2, जालना एसआरपीएफ 1 अधिकारी, जालना ग्रामीण 1, अमरावती शहर 1, उस्मानाबाद 1, नवी मुंबई एसआरपीएफ 1, औरंगाबाद शहर 1, नवी मुंबई 1.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.