Maharashtra Police : लॉकडाऊनच्या काळात विविध गुन्ह्यांसाठी राज्यातून 21 कोटी 16 लाख 99 हजारांचा दंड वसूल

During the lockdown, a fine of Rs 21 crore 16 lakh 99 thousand was recovered from the state for various crimes

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनच्या काळात (22 मार्च ते 17 ऑगस्ट) विविध गुन्ह्यांसाठी राज्यभरात तब्बल 21 कोटी 16 लाख 99 हजार 404 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. कोरोनाच्या संदर्भात भारतीय दंड विधान कलम 188 नुसार 2 लाख 30 हजार 206 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. तर 33 हजार 507 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

लॉकडाऊनच्या काळातील महत्वाची आकडेवारी –

# अत्यावश्यक सेवेसाठी 7 लाख 56 हजार 939 पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत.

# पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – 334 (888 व्यक्ती ताब्यात)

# 100 नंबरवर आलेले फोन – 1 लाख 10 हजार 462

# राज्यभरात ज्यांच्या हातावर क्वारंटाईन (Quarantine) असा शिक्का आहे, अशा 827 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले.

# अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर एक हजार 347 गुन्हे दाखल

# जप्त केलेली वाहने – 95 हजार 822

# कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना 127 पोलीस मृत्युमुखी पडले.

मुंबईतील 55 पोलीस व 4 अधिकारी अशा एकूण 59, ठाणे शहर 14 व ठाणे ग्रामीण 3 व 1 अधिकारी, रायगड 2, पुणे शहर 3, नाशिक शहर 2, सोलापूर शहर 3, अमरावती शहर 1 wpc, मुंबई रेल्वे 4, नाशिक ग्रामीण 3, जळगाव ग्रामीण 2, जालना SRPF 1 अधिकारी, नवी मुंबई SRPF अधिकारी 1, SRPF Gr9 -1, SRPF Gr4 -1, पालघर ग्रामीण 2 व 1 अधिकारी, ए.टी.एस. 1, उस्मानाबाद 1, औरंगाबाद शहर 3, जालना 1, नवी मुंबई 2, सातारा 2, अहमदनगर 2, औरंगाबाद रेल्वे 1, SRPF अमरावती 1, पुणे रेल्वे अधिकारी 1, PTS मरोळ अधिकारी 1, SID मुंबई 1, नागपूर 2, बीड 1, सोलापूर ग्रामीण 1, सांगली 1, बुलढाणा 1)

# सध्या 290 पोलीस अधिकारी व 1963 पोलीस कोरोना बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.