Maharashtra Police : राज्यातील एक हजार 61 पोलीस अंमलदारांची उपनिरीक्षक पदावर बढती

 पिंपरी-चिंचवड शहरातील 17 जणांचा समावेश; 7 अधिकारी बढतीवर शहरात आले

एमपीसी न्यूज – राज्यातील एक हजार 61 पोलीस अंमलदारांना निशस्त्र पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश मंगळवारी (दि. 20) देण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील 9 पोलीस हवालदार, 8 सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. तर सात अधिकारी शहरात बढतीवर आले आहेत.

विभागीय अर्हता परीक्षा 2013 या परीक्षेतील उत्तीर्ण पोलीस अंमलदारांना निशस्त्र पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. पदोन्नती मिळालेल्या अधिका-यांसाठी 15 दिवसांचा इंडक्शन कोर्स होणार आहे. हा कोर्स महराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक आणि पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे होणार आहे. त्याबाबत प्रत्येकाला स्वतंत्र सूचना देण्यात येणार आहेत.

पदोन्नती झालेल्या पोलीस अंमलदारांचे राज्याचे पोलीस महासंचालकांनी अभिनंदन केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील पदोन्नती मिळालेल्या 11 जणांची बाहेर बदली झाली. तर 6 अधिका-यांना शहरातच पदोन्नती मिळाली आहे. पदोन्नतीवर 7 जण पिंपरी चिंचवड शहरात आले आहेत.

बढती मिळालेले शहरातील पोलीस – (कुठून कुठे)

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश पांडुरंग चौधरी (पिंपरी-चिंचवड ते नागपूर शहर)
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिनकर काशिनाथ गावडे (पिंपरी-चिंचवड ते अमरावती परिक्षेत्र)
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आनंद सीताराम दळवी (पिंपरी-चिंचवड ते औरंगाबाद परिक्षेत्र)
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शाकीरगौस मोहद्दिन जिनेडी (पिंपरी-चिंचवड ते अमरावती परिक्षेत्र)
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय आनंदराव काळे (पिंपरी-चिंचवड)
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सिराज फक्रुद्दीन शेख (पिंपरी-चिंचवड)
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सदाशिव निवृत्ती पवार (पिंपरी-चिंचवड)
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू किसानराव दौंडकर (पिंपरी-चिंचवड)
पोलीस हवालदार ऑगस्टीन अॅंथोनी डिमेलो (पिंपरी-चिंचवड)
पोलीस हवालदार अजयकुमार बबन भोसले (पिंपरी-चिंचवड)
पोलीस हवालदार विलास मच्छिंद्र गोसावी (पिंपरी-चिंचवड ते कोंकण परिक्षेत्र – ठाणे ग्रामीण वगळून)
पोलीस हवालदार प्रदीप बाबाजी मोरे (पिंपरी-चिंचवड ते नाशिक परिक्षेत्र)
पोलीस हवालदार संजय बलभीम ढमाळ (पिंपरी-चिंचवड ते नाशिक परिक्षेत्र)
पोलीस हवालदार इक्बाल इस्माईल शेख (पिंपरी-चिंचवड ते नागपूर शहर)
पोलीस हवालदार रमेश शंकर पवार (पिंपरी-चिंचवड ते नागपूर शहर)
पोलीस हवालदार सुब्राव भीमराव गवारे (पिंपरी-चिंचवड ते नागपूर शहर)
पोलीस हवालदार राजन गोविंद महाडिक (पिंपरी-चिंचवड ते नागपूर परिक्षेत्र)

बढतीवर शहरात आलेले पोलीस – (कुठून)

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोहन देवराव साठे (उस्मानाबाद)
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार तुळशीराम भोंगळे (पुणे शहर)
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील बबन खंडागळे (पुणे शहर)
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत रामचंद्र जगताप (पुणे शहर)
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप दशरथ पोटे (पुणे शहर)
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल रोहिदास रीकीबे (पुणे शहर)
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संभाजी शंकर राऊत (पुणे शहर)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.