Maharashtra Political Crises : उद्धव ठाकरेंना धक्का, शिंदे सरकार बचावलं, 16 आमदार अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांकडे!

पदाचा राजीनामा देऊन उद्धव ठाकरे फसले

एमपीसी न्यूज : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल अखेर लागला आहे. सुप्रीम कोर्टाने 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा विधानसभा अध्यक्षांकडे पाठवला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या वर्तनावरून त्यांनी पक्षशिस्तीचं उल्लंघन केलं आहे, त्यामुळे त्यांच्यावर पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत कारवाई व्हावी, असा युक्तीवाद ठाकरेंच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात केला होता. त्यामुळे राज्यातील शिंदे सरकार बचावलं असून महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल शिंदेंच्या बाजूनं लागला आहे.

सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीवेळीही 5 न्यायाधिशांच्या घटनापीठाने आम्ही विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप कसा करू शकतो? असा मुलभूत प्रश्न उपस्थित केला होता. सुप्रीम कोर्टाच्या या टिप्पणीमुळे आमदार अपात्रतेचा मुद्दा विधानसभा अध्यक्षांकडे जाईल, अशी शक्यता तेव्हापासून वर्तवण्यात येत होती.

Maharashtra Political Crises LIVE : राज्यातील शिंदे सरकार बचावलं; महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल शिंदेंच्या बाजूनं

सुप्रीम कोर्टाच्या या निकालामुळे आता या 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आला आहे. (Maharashtra Political Crises) आमदारांना अपात्रतेची नोटीस पाठवली तेव्हा विधानसभा अध्यक्षपद रिक्त होतं, पण आता विधानसभेला अध्यक्ष आहे, त्यामुळे हा विषय आपल्याकडे येईल, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणत आहेत. तर नोटीस मी पाठवली असल्यामुळे याबाबतचा निर्णय मी घेईन, असा दावा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी केला आहे.

 

पदाचा राजीनामा देऊन उद्धव ठाकरे फसले

भाजपाच्या पाठिंब्याने  एकनाथ शिंदे सरकार स्थापनेत हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला, कारण  उध्दव ठाकरे यांनी बहुमत चाचणीला सामोरे न जाता राजीनामा दिला. (Maharashtra Political Crises) जर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नास्ता तर परिस्थिती पूर्ववत करता आली असती. मात्र उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले नाहीत.

ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर कोर्टाने परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे निर्देश दिले असते, असं सरन्यायाधीश म्हणाले. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्याने राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे यांना राज्यपालांनी शपथ देणे योग्य आहे असं सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटलं.

 

भगतसिंह कोश्यारींच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाने ओढले ताशेरे

‘राज्यपालांनी अधिकारांचा अमर्याद वापर केला, असे सांगत सुप्रीम कोर्टाने त्यांना खडेबोल सुनावले आहेत. राज्यपालांच्या समोर सरकार अल्पमतात आल्याचा कुठलाही ठोस आधार नसताना एकनाथ शिंदेना सरकार स्थापन करण्यासाठी बोलवणं हे अयोग्य, असल्याचे मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केले आहे. (Maharashtra Political Crises) तसंच, शिवसेना पक्षाचे अंतर्गत वाद सोडवण्यासाठी राज्यपालांनी त्यांचे अधिकार वापरण अयोग्य आहे. राज्यपालांनी अधिकारांचा चुकीचा वापर केला.’ असे देखील सुप्रीम कोर्टाने सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.