Maharashtra political crisis : राज्याच्या सत्तासंघर्षाचा बहुप्रतिक्षित फैसला उद्याच!

एमपीसी न्यूज :  सत्तासंघर्षाच्या निकालाचा काऊंटडाऊन सुरू  झाला आहे. या निकालाकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. (Maharashtra political crisis) हा निकाल उद्या येणार आहे.  सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एका सुनावणी दरम्यान निकालासंदर्भात टिपण्णी केली आहे. घटनापीठाकडून उद्या दोन महत्वाच्या निकाल लागण्याचे संकेत  सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी दिले आहेत. त्यामुळे सत्ता संघर्षावरही उद्या निकाल लागण्याची दाट शक्यता आहे.  

महाराष्ट्रातील सरकार राहणार की जाणार, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल काय लागणार? याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हा निकाल प्रलंबित असून आता याचा काऊंटडाऊन सुरू झाला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचे भवितव्य ठरवणारा हा निकाल उद्या म्हणजे 11 मे रोजी लागणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एका सुनावणी दरम्यान ही टिपण्णी केली आहे. घटनापीठाकडून उद्या दोन महत्वाच्या निकाल लागण्याचे संकेत सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांनी दिली आहे. त्यामुळे सत्ता संघर्षावरही उद्या निकाल लागण्याची दाट शक्यता आहे.

Pune : अॅस्पायर चषक फुटबॉल स्पर्धेत सिटी एफसी, सनी डेज संघांची आगेकूच

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण पक्षचिन्ह आणि शिवसेना पक्षनाव शिंदे गटाला दिल्याने ठाकरे गटाने या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. (Maharashtra political crisis) याप्रकरणी सुनावणी पूर्ण झाली असून निकालाची प्रतिक्षा होती. आता ही प्रतिक्षा संपली असून याप्रकरणी उद्याच निकाल जाहीर होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. वाय चंद्रचूड यांनी संकेत दिले आहेत..

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.