Maharashtra Political Crises LIVE : राज्यातील शिंदे सरकार बचावलं; महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल शिंदेंच्या बाजूनं

एमपीसी न्यूज :राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा अंतिम निकाल समोर आला आहे. (Maharashtra political crisis)  राज्यातील शिंदे सरकार बचावलं असून महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल शिंदेंच्या बाजूनं लागला आहे.

 

11 May 2023 12:29 PM

मोठी बातमी : 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अध्यक्षाकडेच

  • – जुने सरकार आणण्याची शक्यता कोर्टाने फेटाळली.
  •  निर्णय घेण्यासाठी मोठ्या 7 न्यायाधीशांचे खंडपीठाकडे देण्यात येईल.
11 May 2023 12:27 PM 

महाराष्ट्रात शिंदे-भाजपा निर्णय राहणार का ?

  • राज्यपालांकडे कोणतेही ठोस पुरावे नव्हते.
  • 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांकडे
  • खरी शिवसेना कोण याचा निर्णय अध्यक्षांनी घ्यावा
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना मोठा दिलासा

 

11 May 2023 12:24 PM 

ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर सरकार परत आणलं असतं – कोर्ट

उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर कोर्टाने सरकार परत आणलं असतं असं सरन्यायाधीशांनी सुनावणी दरम्यान म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने ठाकरे गट अडचणीत आले.

 

11 May 2023 12:17 PM 

सुप्रीम कोर्टाचा ठाकरे गटाला दिलासा तर शिंदे गटाला मोठा झटका

  • शिंदे गटाच्या प्रतोदपदी भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर
  •  गटनेत्यापेक्षा पक्षाचा व्हीप महत्वाचा
  •  शिंदे गटाने कुठल्याही पात्रता पाठिंबा काढला नाही असे म्हटले नाही.
  • बहुमत चाचणी पक्षांतर्गत वादासाठी हत्यार म्हणून वापरू शकत नाही.
  •  राज्यपाल यांनी बहुमत चाचणी बोलवायला नको होती.

 

11 May 2023 12:11 PM 

मीचं खरी शिवसेना असा दावा कोणी करु शकत नाही

  • मीचं खरी शिवसेना असा दावा कोणी करु शकत नाही

 

11 May 2023 12:11 PM 

आताची मोठी बातमी : भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर

  •  काही प्रश्नांची उत्तर बाकी आहेत.
  •  हे प्रकरण आता 7 न्यायमूर्तीच्या घटनापीठाकडे सोपविण्यात येत आहे.
  •  व्हीपची नेमणूक विधीमंडळ पक्षाद्वारे किंवा राजकीय पक्षाद्वारे केली जाते.
  • भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर
  • राजकीय पक्षाची आश्वासने आणि धोरण यानुसार मतदान होते. पण, ते नंतर स्वत:ला दुसऱ्या पक्षाशी जोडू शकतात अशी व्यवस्था नाही.

 

11 May 2023 12:07 PM

राजकीय पक्षानं दिलेला व्हिप दहाव्या सुचीसाठी अत्यंत महत्त्वाचा

  • राजकीय पक्षानं दिलेला व्हिप दहाव्या सुचीसाठी अत्यंत महत्त्वाचा
  • 3 जुलैला फुट पडली हे अध्यक्षांना कळालं होतं.
  • सत्तासंघर्षाचं प्रकरण मोठ्या घटनापीठाकडं
  • काही प्रश्नांची उत्तर बाकी आहेत.
  • कोर्टाचा आता चिन्हाबाबत निर्णय
  • गोंगावलेची प्रतोदपती नियुक्ती बेकायदेशीर
  • भरत गोगावले याची नियुक्ती बेकायदेशीर

 

1 May 2023 12:03 PM

निकालाशी संबंधित काही मुद्दे मोठ्या खंडपीठाकडे दिले आहेत

  • सर्वोच्च न्यायालयाने 27 जून 2022 रोजी दिलेला आदेश नबाम रेबियाच्या निर्णयावर विसंबून राहिला नाही आणि केवळ महाराष्ट्र उपसभापतींच्या नोटिसांना उत्तर देण्यासाठी वेळ वाढवला आहे. पाच न्यायाधीशांचा समावेश असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने नबाम रेबिया प्रकरणातील 2016 च्या निकालाशी संबंधित काही मुद्दे मोठ्या खंडपीठाकडे दिले आहेत.

11 May 2023 12:00 PM

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग

  • महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग
  • सुप्रीम कोर्टाची सर्वात मोठी घोषणा

 

11 May 2023 12:00 PM

सुप्रीम कोर्टात निकालाचं वाचन सुरु

  • सुप्रीम कोर्टात निकालाचं वाचन सुरु
  • सात न्यायधिशांकडं सत्तासंघर्षाचं प्रकरण सुरु

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.