Maharashtra Politics Update: मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव एकनाथ शिंदे यांनी फेटाळला, भाजपकडून शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला प्रस्ताव बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी फेटाळून लावला आहे. दरम्यान, भाजपकडून एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आली असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. त्यातच वेळप्रसंगी बहुमत सिद्ध करून दाखविण्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय (Maharashtra Politics Update) गरमागरमी चांगलीच वाढली आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फेसबुकवरील संवादानंतर एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. आघाडीतून बाहेर पडणे का गरेजचं आहे, हे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांचा प्रस्ताव धुडकावत त्यांच्याकडे परत येणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे (Maharashtra Politics Update) सर्वांचं लक्ष लागले आहे.

1. गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला,आणि शिवसैनिक भरडला गेला.
2. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे – शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे.
3. पक्ष आणि शिवसैनिक टिकवण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक.
4. महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे.

भाजपकडून उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर?

एकनाथ शिंदे यांना भाजपकडून उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आली आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. भाजपच्या  या प्रस्तावावर आता एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपकडून एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आली आहे. शिवसेना आमदार आणि भाजपमध्ये यासंदर्भात (Maharashtra Politics Update) वाटाघाटी सुरू आहेत.

महाविकास आघाडीमधील मित्र पक्षांची ग्रामीण भागातील ताकद झपाट्याने वाढत आहे. शिवसेनाचा विस्तार होत नसल्याचा शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा आरोप आहे. शिवसेनेच्या नेत्यांची कामे होत नाहीत. कामे झालीच तर त्याचे श्रेय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस घेतात, असा बंडखोर शिवसेना आमदारांचा आक्षेप आहे. आज सकाळी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली. मात्र, ती निष्फळ ठरली.

Uddhav Thackeray : गायब आमदारापैकी कुणीही थेट येऊन सांगावं, या क्षणाला मुख्यमंत्रीपद सोडायला तयार – उद्धव ठाकरे

शिवसेनाबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेविषयी उद्धव ठाकरे यांना अनेकदा सांगितले. पण त्यांच्याकडून कोणताही कठोर निर्णय घेण्यात आला नाही. उद्धव ठाकरे यांना भेटण्याचा निर्णय येथे असणारे सर्व आमदार मिळून घेतील, एकटे एकनाथ शिंदे हा निर्णय घेऊ शकत नाहीत, अशी भूमिका बंडखोर आमदारांनी घेतली असल्याचे समजते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.