Maharashtra Corona Update : राज्यात 12,160 कोरोना रुग्णांची नोंद, मुंबईत 8,082 रुग्ण

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग हात – पाय पसरू लागला आहे. राज्यात आज (सोमवारी) 12 हजार 160 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी 8 हजार 82 रुग्ण एकट्या मुंबईमधील आहेत. तसेच आज 68 ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 40 रुग्ण मुंबईमधील आहेत.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 67 लाख 12 हजार 028 एवढी झाली आहे. त्यापैकी 65 लाख 14 हजार 358 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज 1,748 बरे झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्याचा रिकव्हरी रेट 97.05 टक्के एवढा झाला आहे.

राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या पुन्हा वाढली असून, सध्या 52 हजार 422 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात 11 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजवर 1 लाख 41 हजार 553 जणांचा मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.11 टक्के एवढा आहे.

राज्यात सध्या 2 लाख 32 हजार 610 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 1,096 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.