Pune: शहरात आढळले कोरोना विषाणूचे दोन ‘पॉझिटीव्ह’ रुग्ण!

एमपीसी न्यूज –  पुण्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले दोन ‘पॉझिटीव्ह’ रुग्ण सापडले आहेत. पुण्यातील हे दाम्पत्य दुबईवरुन एक तारखेला पुण्यात परतले होते.  हे दोघे एका ट्रॅव्हल एजन्सीमार्फत दुबईला पर्यटनासाठी गेले होते. मात्र एक तारखेला ते जेव्हा पुण्यात आले तेव्हा त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती, मात्र आज त्यांना त्रास होऊ लागल्याने हे पती (वय 51)- पत्नी (वय 49) तपासणीसाठी महापालिकेच्या नायडू हॉस्पिटलमधे पोहचले. त्यानंतर त्यांची सॅपल्स तपासणीसाठी ‘एनआयव्ही’कडे पाठवण्यात आली असता ती ‘पॉझिटीव्ह’ आढळली. महाराष्ट्रातील कोरोना व्हायरसची ही पहिली घटना आहे

हे दाम्पत्य २० ते २९ फेब्रुवारी दरम्यान दुबईला गेले होते.  ते एक मार्चला दुबईहून परत आले. तेव्हा त्यांच्यामधे कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती आणि दुबईमधे कोरोनाची लागण झाल्याचे तोपर्यंत दिसून आलेले नव्हते. त्यामुळे या दोघांबरोबरच ते ज्या चाळीस जणांबरोबर दुबईला गेले होते त्यापैकी कोणाच्याही चाचण्या करण्यात आल्या नव्हत्या, असे स्पष्टीकरण पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहे,  मात्र आता हे पती- पत्नी कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने ते ज्यांच्यासोबत दुबईला गेले होते त्या 40 जणांच्याही चाचण्या कराव्या लागणार आहेत. त्याचबरोबर कोरोना पॉझिटीव्ह आढळलेले हे पती-पत्नी मागील आठ दिवसांमध्ये ज्यांच्या संपर्कात आले असतील, अशा सर्वांचा शोध घ्यावा लागणार असल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे,.

_MPC_DIR_MPU_II

दोघांना नायडू रुग्णालयात विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले आहे. दोन्ही रुग्णांवर उपचार सुरू असून दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. त्यापैकी एका रुग्णामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून येत आहेत तर दुस-या रुग्णामध्ये अद्याप लक्षणे आढळून आलेली नाहीत. दोन्ही रुग्णांच्या  सदर रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेवून त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. तथापि, नागरिकांनी घाबरुन जाण्याची काहीही कारण नाही, असे शासकीय प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

संबंधित वृत्त 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.