Pimpri News : कासारवाडी येथे 24 ऑक्टोबरला होणार ‘महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञी आणि सम्राट’ स्पर्धा

एमपीसी न्यूज – खान्देश अहिराणी कस्तुरी साहित्य सांस्कृतिक कला, क्रिडा मंचाच्या वतीने ‘महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञी आणि सम्राट’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्व स्तरातील मुली, महिला सहभाग घेणार आहेत. प्रसिद्ध अभिनेते मिलिंद गुणाजी यांच्या प्रमुख उपस्थितीत 24 ऑक्टोबरला हॉटेल कलासागर, कासारवाडी येथे ही स्पर्धा पार पडणार आहे. शहरातील सर्वात पहिले वेबपोर्टल ‘एमपीसी न्यूज’ हे या स्पर्धेसाठी माध्यम प्रायोजक आहे.

खान्देश अहिराणी कस्तुरी साहित्य सांस्कृतिक कला क्रीडा मंच अध्यक्षा विजया मानमोडे या सौंदर्य स्पर्धेच्या आयोजक आहेत तर, चारूशिला देशमुख या सह -आयोजक आहेत. मराठी मुला – मुलींच्या कलागुणांसाठी व्यासपीठ मिळावे तसेच, मराठी भाषेचा विकास या उद्देशाने 2017 पासून ही स्पर्धा आयोजित केली जाते. राज्यातील एकमेव अस्सल मराठमोळी सौंदर्यस्पर्धा म्हणून या स्पर्धेचा नावलौकिक राज्यभर आहे.

मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेते मिलिंद गुणाजी, अभिनेत्री श्रेया बुगडे, अभिनेता पंढरीनाथ कांबळे (पॅडी), अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, दूरदर्शन सह्याद्री वाहिनी निवेदक अक्षय बनकर, अभिनेत्री राधिका पाटील, कलाकार चेतन म्हस्के, अभिनेत्री सिद्धी पाटणे या स्पर्धेसाठी खास उपस्थित राहणार आहेत.

 

या दिग्गज कलाकारांसमोर स्पर्धकांना आपले कलागुण दाखवण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे तरूण मुली, मुलांनी तसेच महिला व पुरूषांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन मंचाच्या अध्यक्षा विजया मानमोडे यांनी केले आहे. जुना पुणे मुंबई महामार्ग, कासारवाडी येथील हॉटेल कलासागर येथे 24 ऑक्टोबर रोजी हा कार्यक्रम होणार आहे.

हा कार्यक्रम कोरोना बाबतच्या सर्व नियमांचे पालन करून पार पडणार आहे. आयोजकांकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येणार असून स्पर्धक आणि प्रेक्षकांनी देखील नियमांचे पालन करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

संपर्क –
9823113177 / 9881888566

हे नक्की पहा –

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.