Maharashtra School Closed : राज्यात शाळा बंद करण्याच्या निर्णयावर शिक्षणतज्ज्ञांचे प्रश्नचिन्ह; शिक्षणात खंड पडण्याची भीती व्यक्त

एमपीसी न्यूज – राज्यात कोरोना संकट पुन्हा जोर धरू लागले आहे. ओमायक्रॉन या नव्या व्हेरीयंटच्या रुग्णांची संख्या सुद्धा झपाट्याने वाढू लागली आहे आणि याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील दहावी, बारावीचे वर्ग वगळता शाळा १५ फेब्रुवारी पर्यत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दरम्यान, हा निर्णय योग्य नसल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. 

शाळा बंद करण्याचा निर्णय अशैक्षणिक असल्याने या निर्णयाला अनेक ठिकाणांहून विरोध करण्यात येत आहे. तब्बल दोन वर्षानंतर शाळा सुरू झाल्याने आता कुठे शाळेत शैक्षणिक वातावरण निर्मिती होत होती, त्यामुळे घेतलेला हा निर्णय घाईगडीने तर घेतला गेला नाही ना, असा प्रश्न यानिमित्ताने तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

ओमायक्राॅन आणि कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेत सुरवातीला मुंबई, ठाणे त्यानंतर पुणे, नाशिक आणि औरंगाबाद शहरातून शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर 8 जानेवारी रोजी नवीन मार्गदर्शक सूचना दिल्या गेल्या त्यामध्ये  दहावी बारावीचे वर्ग सोडून इतर राज्यभरातील सर्व शाळा या 15 फेब्रुवारी पर्यंत बंद राहतील असा मोठा निर्णय घेण्यात आला. या निर्णयालाच राज्यातील शिक्षण तज्ज्ञ, शिक्षक व पालकांकडून मोठा विरोध होत आहे.

तज्ज्ञांच्या मते शाळा बंद केल्यास काय परिणाम उद्भवू शकतात?

  • विद्यार्थी पुन्हा शिक्षण प्रवाहापासून दूर जाण्याची भीती
  • शाळाच बंद असल्याने लेखन, वाचन, ग्रहण क्षमतेला कमी वाव
  • ग्रामिण भागात ऑनलाईन शिक्षण शक्य होत नसल्याने, ग्रामिण आणि शहरी विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक दरी निर्माण होण्याची भीती
  • विद्यार्थ्यांचे वार्षिक मुल्यमापन करताना परिणाम जाणवणार

गेले दोन वर्षे मुलं ऑनलाईन शिक्षण घेत आहेत, मात्र याबाबत पर्यायी शिक्षण व्यवस्थेविषयी अजूनही अनास्था पाहायला मिळत आहे. दरम्यान सरकारकडून कोविड संकटात शाळा बंद ठेवण्याच्या निर्णयाला विरोध होत असला तरीही मुंबई, पुणे सारख्या मोठ्या शहरांत ऑनलाईन शिक्षणावरच मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत असून त्याबाबत योग्य नियोजन सुद्धा करण्यात येत आहे.

पाहा शिक्षण तज्ज्ञ नेमकं काय म्हणाले?

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.