Pimpri News: महाराष्ट्र राज्य ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीची पिंपरी पुणे येथे संपन्न

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड मध्ये राज्यभरातील सर्व रिक्षा चालक मालकांची संयुक्‍त कृती समिती स्थापन असून या समितीच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांची एकमताने सर्वांनी निवड केली आहे. महासचिव पदी कासम मुलाणी, कार्याध्यक्षपदी वैजनाथ देशमुख यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

पिंपरीत राज्यभरातील रिक्षा चालक-मालक संघटनांच्या प्रतिनिधींची परिषद मोठ्या उत्साहात पार पडली. नांदेड येथील वैजनाथ देशमुख परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते. राज्यभरातून संघटनेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी अध्यक्षपदासह इतर पदांच्या निवडीचा ठराव करण्यात आला असल्याचे वैजनाथ देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.

या वेळी नरेंद्र गायकवाड (नांदेड) गफारभाई नदाफ (कराड) आनंद तांबे ,बापू भावे (पुणे) रामभाऊ पाटील फिरोज मुल्ला,(सांगली) कासम मुलाणी (मुंबई) आनंद चौरे,रवी तेलरंदे, (नागपुर) राहुल कांबळे ( कल्याण डोंबिवली), तानाजी मासलकर, बाळू फाळके (सोलापूर), शिवाजी गोरे, आशिष देशपांडे (ठाणे), बल्लूर स्वामी (इचलकरंजी) सानी हुमने,अब्बास भाई (चंद्रपूर) आदीसह राज्यभरातून विविध संघटनांचे प्रतिनिधी, रिक्षा चालक-मालक उपस्थित होते.

Vadgaon Maval : वडगाव मावळ येथील सहाय्यक निबंधक कार्यालय बेवारस?

या वेळी बाबा कांबळे म्हणाले की, रिक्षा चालक मालकांच्या हक्‍कासाठी संपूर्ण आयुष्यभर मी लढा दिला आहे. पुढेही देत राहणार आहे. रिक्षा चालकांच्या समस्या सुटेपर्यंत रस्त्यावरची लढाई लढणार आहे. रिक्षा चालक-मालक बांधवांना चुकीच्या मार्गाला घेऊन जाणे हे मनाला पटणारे नाही कायद्याच्या चौकटीत राहूनच न्यायासाठी लढा दिला आहे. त्यामुळे अनेकांनी मला साथ दिली आहे. स्वर्गीय शरद राव यांनीही कृती समिती स्थापन केली आहे याचे अध्यक्ष स्वर्गीय शरद राव होते त्यांच्या निधनानंतर हे अध्यक्ष पद मला मिळणार होते परंतु त्यावेळेस ते नाकारले होते.

परंतु आज महाराष्ट्रात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आणि सर्वांनी एकमताने ठराव मंजूर केल्यामुळे मी कृती समितीच्या अध्यक्षपदी माझी निवड केली, स्वर्गीय शरद राव यांच्या स्वप्नातील कृती समिती निर्माण करून त्यांचे राहिलेले गुरुवारी सर्व कार्य या समितीच्या मार्फत संपूर्ण करणार असल्याचे बाबा कांबळे म्हणाले. जबाबदारी वाढली असून रिक्षा चालकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी दिवसरात्र मेहनत करणार असल्याचेही कांबळे यांनी सांगितले.

समितीतून काही प्रतिनिधींची हकालपट्टी

ऑटो रिक्षा चालक-मालक संयुक्त कृती समिती, महाराष्ट्र या वेळी करण्यात आली. पुणे येथे रिक्षा चालकांच्या हितासाठी टू व्हीलर विरोधी समिती स्थापन करण्यात पुढाकार घेतला असे बाबा कांबळे म्हणाले. मात्र या समितीमध्ये, बोगस रिक्षा संघटनांचा प्रवेश झाल्यामुळे, ही समिती बरखास्त करण्याचा निर्णय ठराव मंजूर करण्यात आला असल्याचे बाबा कांबळे यांनी सांगितले. या पुढे पुणे शहरातील रिक्षा संघटनेच्या वतीने कृती समितीच्या माध्यमातून बेकायदेशीर टू व्हीलर विरोधीचा लढा लढला जाणार आहे. याला पुणे, पिंपरी चिंचवड मधील सर्व रिक्षा संघटना व रिक्षा चालक मालकांचा देखील पाठिंबा आहे. महाराष्ट्रात काही चुकीची लोक रिक्षा संघटनांचे प्रतिनिधीत्त्व करत आहेत. ते रिक्षा चालकांची दिशाभूल करत आहेत. टू व्हीलर विरोधी समिती समिती स्थापन करून लोकांची फसवणूक काही लोक करत आहेत. २८ नोव्हेंबर रोजी शांतता मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण देत रिक्षा चालकांना भडकविण्याचे कामे केली. या मुळे २ हजार ५०० गोरगरीब रिक्षा चालकांवर गुन्हे दखल झाले आहे. याप्रकरणी दोषी असलेल्या बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष केशव क्षिरसागर व ईतर काही व्यक्तींची समितीतून हकालपट्टी करण्याचा ठराव देखील यावेळी मंजूर करण्यात आला, आहे. या पुढे केंद्र व राज्य सरकारने पुणे येथील टू व्हीलर बाइक विरोधी कृती समितीशी कोणताही व्यवहार करू नये, असा ठराव देखील करून राज्य सरकारला पाठविण्यात येणार असल्याचे बाबा कांबळे यांनी सांगितले.

समितीच्या बैठकीत हा ठराव झाला

महाराष्ट्रामध्ये सर्व शहरांमध्ये टू व्हीलर रॅपिडो, ओला-उबेरमुळे रिक्षा वाहतुकीला फटका बसला आहे. त्यामुळे त्या विरोधात आंदोलन करणे. रिक्षा चालक मालकांच्या कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यासाठी पाठपुरावा करणे. यासह अनेक मागण्यांचा ठराव करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.