_MPC_DIR_MPU_III

Mumbai : आगामी सण आणि पोलिसांना विश्रांती मिळावी यासाठी राज्याची CRPF च्या 20 कंपन्यांची मागणी

maharashtra state govt asks for more police force from the centre amid coronavirus pandemic

एमपीसी न्यूज – आगामी सण आणि लॉकडाऊनच्या काळात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना उसंत मिळावी यासाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 20 तुकड्यांची राज्य शासनाने केंद्र सरकारकडे मागणी केली असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

मुस्लिम बांधवांचा पवित्र मानला जाणारा रमजान ईद हा सण 12 दिवसांवर आला आहे. त्यामुळे या सणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहावी. सर्व मुस्लिम बांधवांना कोरोनाचा प्रादुर्भाव टाळून सण साजरा करता यावा, यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

त्यातच लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र पोलीस अविरत कर्तव्य बजावत आहेत. जाराशीही उसंत न घेता पोलीस कोरोनाची लढाई लढत आहेत. राज्यातील सर्व रस्ते, प्रमुख चौक, गल्ल्या आणि इतर विविध ठिकाणी पोलीस चेक पोस्ट, पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत. लॉकडाऊनची काटेकोरपणे अंमलबजावणी होण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहे.

राज्यातील 819 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील सात पोलिसांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांपुढील आव्हाने, कामाची वेळ वाढत आहे. सदैव प्रयत्नशील असणाऱ्या पोलिसांना जराशी उसंत मिळावी, रिफ्रेश होऊन पुन्हा कर्तव्यावर हजर होता यावे, यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारकडे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 20 तुकड्यांची मागणी केली आहे. त्यानुसार 2 हजार पोलिसांची कुमक मागविण्यात आली आहे, असेही गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.