Maharashtra : राज्य परिवहन महामंडळाला राज्य शासनाकडून मिळणार एक हजार कोटी

एमपीसी न्यूज – नागपूर येथे आज (गुरुवार, दि. 7) पासून विधिमंडळाचे (Maharashtra)हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी 23 पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या. त्यामध्ये राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सवलतीची प्रतिकृती करण्यासाठी एक हजार कोटींची मागणी करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एसटी) प्रवाशांच्या सोयीसाठी विविध सवलती दिल्या जातात. या सवलतींच्या रकमेची प्रतिपूर्ती राज्य शासनाकडून केली जाते. राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून प्रवाशांना विविध सवलती दिल्या आहेत. त्यामुळे एसटीची प्रवासी संख्या वाढण्यावर सकारात्मक परिणाम झाला आहे.

Vadgaon : माजी उपसरपंच एकनाथ गाडे यांचा आदर्श समाजसेवक पुरस्काराने गौरव

महिला आणि 65 वर्षांवरील पुरुषांना (Maharashtra)एसटीच्या तिकीट दरामध्ये 50 टक्के सवलत आहे. तर 75 वर्षांवरील सर्वांना 100 टक्के सवलत आहे. अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी 100 टक्के सवलत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना मासिक पास योजनेअंतर्गत 66 टक्के सवलत दिली जाते. यासह अनेक सवलती एसटी कडून दिल्या जातात. त्याचाही प्रवाशांना आणि प्रसंगी एसटीला फायदा होत आहे.

या सवलतीच्या तिकीट दरातील रकमेची प्रतिपूर्ती राज्य शासनाकडून एसटीला केली जाते. ही रक्कम देण्यासाठी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी 1000 कोटी रुपयांची पुरवणी मागणी केली आहे.

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.