Pimpri News : युवक काँग्रेसचा मंगळवारी विधानसभेला घेराव

एमपीसी न्यूज – केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांवरती जनता नाराज असून सरकारच्या या धोरणांमुळे जनता मेटाकुटीला आली आहे. (Pimpri News) त्यामुळे या चुकीच्या धोरणांविरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे. त्याअनुषंगाने उद्या (मंगळवारी) मुंबईत विधानसभा घेराव आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव चंद्रशेखर जाधव यांनी दिली आहे.

याबाबत जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, कोणतीही राजकीय, सामाजिक आणि आर्थिक अस्थिरता ही सरकारच्या धोरणाचे अपत्य असते. गेल्या नऊ वर्षातील मोदी सरकारचे धोरण पाहता अच्छे दिन नको जुने दिन परत आणा अशी बहुसंख्य भारतीयांची भावना झाली आहे. नोटबंदीचे अघोरी कृत्य, सेवा आणि वस्तू कर यांची चुकीची अंमलबजावणी आणि रशिया-युक्रेन युद्ध यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर भीषण परिणाम झाला आहे.

 

 

Pimpri News : यांत्रिकी पद्धतीने रस्ते सफाईची निविदा रद्द करा; आमदार अश्विनी जगताप यांची मागणी

केंद्रीय स्तरावरून सुरुवात झालेले हे राजकारण राज्यांपर्यंत देखील येऊन पोहोचले आहे.  सरकारने आपल्या पाशवी बहुमताच्या जोरावर शासकीय यंत्रणेचा वापर करून  देशात राजकीय अस्थिरता निर्माण केली आहे. याचे शिकार छोट्या राज्यांसह मोठी राज्ये देखील होत असून महाराष्ट्र (Pimpri News) देखील त्याचे शिकार झाले आहे. महाराष्ट्रातील शिव-शाहू-फुले-गांधी-आंबेडकर यांचा वैचारिक वारसा, महाराष्ट्रातील सुजलाम, सुफलाम भूमीतील उद्योगधंदे, महाराष्ट्राचा आत्मा मुंबई यावर नियोजनबद्ध रीतीने घाला घालायचे काम चालू आहे. याविरोधात योग्यवेळी आवाज उठवला नाही तर महाराष्ट्रातील पुरोगामी विचार, इथली सुपीक जमीन, उद्योगधंदे, तरुणांचे भविष्य सर्वच नष्ट होऊन जाईल.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.