Maharashtra : पवित्र संकेतस्थळाद्वारे शिक्षक भरती प्रक्रियेला सुरुवात,  11  हजार 85  उमेदवारांची निवड

एमपीसी न्यूज – शिक्षक विभागातर्फे पवित्र संकेत स्थळाद्वारे ( Maharashtra ) शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यात 11  हजार 85 पदांवर उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.

आयोगाने लोकसभा निवडणुकीचे मतदान झालेल्या जिल्ह्यांत शिक्षकांची नियुक्ती प्रक्रिया करण्यास परवानगी देण्यात आली.

 

PCMC : पिंपरी-चिंचवड शहरात 1200 होर्डिंग; 15 दिवसात होणार होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडीट

 लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर लागू झाल्यामुळे निवड झालेल्या झालेल्या शिक्षकांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया लोकसभा निवडणुकीमुळे थांबली होती. मात्र शिक्षण विभागाने भरती प्रक्रियेच्या पुढील कार्यवाहीबाबत निवडणूक आयोगाला प्रस्ताव दिला होता.त्यानुसार लोकसभा निवडणुकी पाठोपाठ विधान परिषदेतील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणूक जाहीर झाल्याने या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नियुक्ती प्रक्रिया आणखी पुढे ढकलली जाण्याची शक्यता निर्माण झाली ( Maharashtra ) होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.