Sports News : 48 व्या कुमारीगट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राचा संघ जाहीर; सानिका पाटीलकडे नेतृत्व

एमपीसी न्यूज – बिहार येथील पाटलीपुत्र येथे दि.1 ते 4 सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या “48 व्या कुमारी गट” राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राने मंगळवारी आपला 12 जणांचा संघ जाहीर केला.

मुंबई उपनगरच्या सानिका परेश पाटील हिच्याकडे संघाच्या नेतृत्वाची कमान सोपविण्यात आली.सध्या हा संघ अतिग्रे कोल्हापूर येथील संजय घोडावत उद्योग समूह यांच्या संयोजनाखाली संजय घोडावत विद्यापीठाच्या बंदिस्त क्रीडा संकुलात सराव करीत आहे.प्रशिक्षिका वर्षा भोसले खेळाडूंकडून डावपेचाचे धडे गिरवून घेत आहेत.

संजय घोडावत उद्योग समूहाचे चेअरमन संजय घोडावत यांनी या सराव शिबिराला जातीने भेट देऊन सर्व सुविधांची पहाणी केली आणि संघाला स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले, प्राचार्य विराट गिरी या सराव शिबिरात कोणतीही कसर राहू नये म्हणून लक्ष ठेऊन आहेत. घोडावत विद्यापीठ संघाचे प्रशिक्षक महेश गावडे यात समन्वयक म्हणून काम बघत आहेत. हा निवडण्यात आलेला संघ 29 ऑगस्ट रोजी मुंबईतील राज्याच्या कार्यालयात दाखल होऊन,दि.30 ऑगस्ट रोजी सकाळी छत्रपती शिवाजी टर्मिनन्स येथून सुविधा एक्सप्रेसने स्पर्धेकरिता रवाना होईल. राज्य कबड्डी संघटनेचे सरचिटणीस आस्वाद पाटील यांनी प्रसार माध्यामाकरिता मंगळवारी हा संघ जाहीर केला.

संघ पुढीलप्रमाणे :

सानिका परेश पाटील – संघ नायिका, याशिका पुजारी (दोन्ही मुंबई उपनगर), रेणुका नम, ज्युली मिस्किटा, श्रुती सोमाणे (तिन्ही पालघर), तृप्ती अंधारे, कोमल ससाणे (दोन्ही औरंगाबाद),अनुजा शिंदे, ऋतुजा आंबी (दोन्ही सांगली), मनिषा राठोड (पुणे), सानिका पाटील (नांदेड), प्राची भादवणकर (मुंबई शहर).  संघ प्रशिक्षिका : वर्षा भोसले, संघ व्यवस्थापिका : कोमल चव्हाण.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.