Maharashtra : 28 मे रोजी पंतप्रधानांच्या हस्ते होणार नव्या संसदेचे उद्घाटन; स्वातंत्र्यवीर सावकरांचा अनोखा सन्मान?

एमपीसी न्यूज : अलीकडच्या काळात स्वातंत्र्यवीर सावकर यांच्यावर (Maharashtra) कॉँग्रेस पक्षाकडून विरोध होताना पाहायला मिळाला. तर सावकरांना भारतरत्न मिळावा म्हणून सावरकर प्रेमींची मागणी नेहमीच अग्रेसर राहिली आहे.

नव्या भारताची ताकद दर्शवणाऱ्या नव्या संसदेच्या इमारतीची उभारणी करण्यात आली आहे. या संसदेचे उद्घाटन 28 मे रोजी होणार असून हा दिवस स्वातंत्र्यवीर सावकर यांचा जन्मदिवस असल्याने हा सावरकरांना अनोखा सन्मान ठरणार आहे.

Chikhali : चिखली पोलिसांनी सराईतास ठोकल्या बेडया; एकूण 4 गुन्हे उघड

28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते या नव्या संसदेचं उद्धाटन होणार आहे. हा योगायोग नसून यामागे काहीतरी कारण असल्याची चर्चा सुरू आहे. भाजप पक्ष नेहमीच सावरकर प्रेमी (Maharashtra) म्हणून ओळखला जातो. त्यात कॉँग्रेसचा टोकाचा सावरकर विरोध पाहता 28 मे ही तारीख मुद्दाम निवडल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.