Maharashtra : पालकांची जबाबदारी आता वाढली आहे!

एमपीसी न्यूज : दिल्लीत साहिलने साक्षीचा 20 वार करुन (Maharashtra) दगडाने ठेचून खून केल्याची बातमी वाचण्यात आली. अश्या प्रकारच्या एकतर्फी प्रेमातुन घडणा-या घटनांमध्ये सतत वाढ होताना दिसून येत आहे .

साहिलला अटक झाली आहे. याचा पोलीस पुढील तपास करीत आहेत. अश्या प्रकाराचे आणखी एक प्रकरण पुढे आले. आता नवीन प्रकरण होईपर्यंत याचीच चर्चा होत रहाणार. पण हे चक्र कसे थांबावयाचे? यावर उपाययोजना आता पालकांनाच करावी लागणार आहे.

सतत या संबधी घटनांना जातीय, धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न होत राहतो. पण गेलेला जीव मात्र परत येत नाही. मृतक साक्षीच्या मैत्रिणीची मुलाखत प्रसिद्ध होत आहे. मृतक साक्षी आणि आरोपी साहील याची अनेक वर्षापासून मैत्री होती आणि गेले काही महिने त्यांच्यात टोकाची भांडणे होत होती.

मृतकाची आई आता आरोपीस फाशी व्हावी ही मागणी करत आहे. आता काय उपयोग येथे आरोपी कोण आहे? हे महत्वाचे नाही तर आपली जबाबदारी आपण योग्य पद्धतीने पाळतो आहे की नाही हे ही तपासून पहाणे गरजेचे आहे.

या सर्व घटनांना जबाबदार कोण? हा प्रश्न आता विचारला गेला पाहिजे. इतके दिवस हे चालू होते तर ते थांबविण्यासाठी कोणी प्रयत्न का केला नाही? का कोणालाच याची माहिती नव्हती. या वर कायदेशीर संरक्षण मिळते त्यासाठी काय करावे? याबाबत जनजागृतीची ही आता अवश्यकता आहे. हा विषय फक्त चित्रपटाचा विषय होता कामा नये, तर त्या विषयी ठोस बंदोबस्तही झाला पाहिजे.

अश्या प्रकारच्या घटनांमध्ये पालकांची जबाबदारी काय असते? बऱ्याच वेळा बदनामी व गुप्ततेच्या नावाखाली एकमेंकाना अशी गोष्ट सांगत नाही, कोणाशी मनातील आपण बोलत नाही. कोणला आपले प्रश्न सांगत नाही त्यामुळे त्याची उत्तरे समजत नाही. या प्रश्नावर समाधान मिळत नाही.

खरे तर आता तरी सर्वांनी जागे झाले पाहिजे. विशेष म्हणजे ज्यांना वयात आलेली मुले मुली आहेत त्यांनी.

ही जबाबदारी आता आई वडिलांनी पालक म्हणून घेतली पाहिजे. आपल्या सोशल मिडीयाचा अति वापर बंद करुन, भिशी, कवीता, गाणी, फिरणे, पाटर्या या विश्वातुन बाहेर पडून मुलांमुलींचे खरे मैत्र मैत्रिण झाले पाहिजे.

आपली मुले काय करतात? त्यांचे मित्र मैत्रिणी कोण आहेत? त्यांना आपण किती स्वातंत्र देतो आहोत याचा आता आढावा घेण्याची वेळ आली आहे. आपल्या मित्र परिवारांकडून आपल्या पाल्यांची माहिती गोळा केली पाहिजे. आपण एकमेंकाना या बाबत सामाजिक जबाबदारी म्हणून सहकार्य करायला हवे.

सध्याच्या काळात आपल्या मुलांवर अतिविश्वास ठेवणे उपयोगी नाही. नाहीतर असे परिणाम होतात.

“थोडं घराकडेही लक्ष देऊ… ही मोहीम आता प्रत्येकाना स्वत:पुरती राबवली पाहिजे. प्रत्येक वेळी असेच घडेल असे नाही तर वेगवेगळया प्रकारची संकटे येऊ शकतात.

आता सर्वानी आपल्या मुलांचे मित्र झाले पाहिजे. त्यांच्या सोबत मित्रत्वाने संवाद साधत त्यांना विश्वासात घेतले पाहिजे. त्यांच्या वागणुकीतून बदल लक्षात घेऊन वेळीच त्यावर उपाय योजले पाहिजेत. वेळ गेल्यावर पश्चाताप करुन काही उपयोग होत नाही.

आपल्या मित्रपरिवाराची मुले ही आपलीच आहेत, ही भावना ठेवून सर्वानी एकमेंकाच्या मुलांकडे लक्ष ठेवले पाहिजे. तरच या दृष्ट आघातापासून सर्व सुरक्षित राहू शकतील. काही जात्यात आहेत तर काही सुपात! त्यामुळे अखंड सावधानता हाच त्यावरील उपाय आहे

अजित देशपांडे 9850400310
संत विचार अध्यासन

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.