Maharashtra : वाहतूक शिस्तीसाठी जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर अद्ययावत ITMS बसवणार – उपमुख्यमंत्री

एमपीसी न्यूज : जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील (Maharashtra) अपघात कमी करण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. वाहतुकीचे नियमन करण्यासाठी अद्ययावत इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) बसविण्यात येणार असून, वाहतुकीची शिस्त लागावी यासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी मिसिंग लिंकही पूर्ण केली जाईल.

जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अपघात कमी करण्याच्या उपाययोजनांबाबत सदस्य भाई जगताप यांनी उपस्थित केलेल्या सूचक प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, अत्याधुनिक आयटीएमएस प्रणालीचा वापर करून त्याचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.

Alandi News : श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानची सासवड ते वाखरी पालखी स्थळांची पाहणी

लेन शिस्त. वाहतूक पोलिसही नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार आहेत. याशिवाय, सर्व वाहनचालकांचे अद्ययावत मोबाइल क्रमांक एकत्रित करून त्यांना दंडाची माहिती देऊन ते तातडीने (Maharashtra) वसूल केले जातील.

यानंतर भाई जगताप, अनिकेत तटकरे, महादेव जानकर, सतेज पाटील यांच्यासह सदस्यांनी अधिक माहितीसाठी उपप्रश्न उपस्थित केले. ITMs प्रणाली बसवल्याने वाहतूक शिस्त मोठ्या प्रमाणात वाढेल आणि व्यस्त राष्ट्रीय महामार्गावरील अपघात कमी होतील अशी अपेक्षा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.