Maharashtra Update: राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 1,761 तर मृतांचा आकडा 127

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रातील करोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच असून आज त्यात 187 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1,761 झाली आहे. राज्यातील मृतांचा आकडा 127 वर जाऊन पोहचला आहे.

राज्यात आतापर्यंत एकूण 31 हजार 841 कोरोना निदान चाचण्या घेण्यात आल्या आहेत. एकूण कोरोनाबाधित रुग्ण 1,761 आहेत. त्यापैकी 1,446 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. आतापर्यंत एकूण 188 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. राज्यातील मृतांचा एकूण आकडा 127 झाला आहे.

राज्यात काल कोरोनाबाधितांची संख्या 1,574 होती. त्यात आज 187 ने वाढ झाली. एकट्या मुंबईत आज 138 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या एक हजारच्या पुढे गेली आहे. मुंबईतील संसर्ग रोखण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारपुढे आहे. कालच्या दिवसात राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा 210 ने  वाढला होता. हा आतापर्यंतचा एका दिवसातील उच्चांक होता. मात्र, आज ही वाढ तुलनेत कमी असल्याचे दिसून येत आहे.

मुंबईतील करोनाबाधितांची संख्या 1,182 इतकी झाली आहे. आत्तापर्यंत एकट्या मुंबईत करोनाची लागण झाल्याने 75 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्या 11 जणांचा मृत्यू आज झाला त्यापैकी 10 जणांना इतर आजारांनीही ग्रासले होते. तसेच त्यांचे वयही झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.