22.4 C
Pune
मंगळवार, ऑगस्ट 9, 2022

Maharashtra Vidhan Sabha: मुख्यमंत्री विधानसभा बरखास्तीची शिफारस करणार?

spot_img
spot_img

एमपीसी न्यूज – शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकविल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकारने बहुमत गमावल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केले आहे. त्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra Vidhan Sabha) बरखास्तीची शिफारस करून राजीनामा देतील, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.    

कालपासूनच राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच राऊत यांनी केलेल्या एका ट्वीटमुळं चांगलीच खळबळ माजली आहे. संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा (Maharashtra Vidhan Sabha) बरखास्तीच्या दिशेने..”

संजय राऊतांनी अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचे संकेत दिले असल्याचं बोललं जात आहे. राजीनामा देण्यापूर्वी राज्याचे मंत्रिमंडळ विधानसभा बरखास्तीची शिफारस राज्यपालांकडे करू शकते.

राज्याच्या मंत्रिमंडळाने विधानसभा (Maharashtra Vidhan Sabha) बरखास्तीची शिफारस केली तरी मंत्रिमंडळाने बहुमत गमावले असल्याचे सिद्ध झाल्यास त्याची शिफारस स्वीकारायची नाही, याबाबत राज्यपाल निर्णय घेऊ शकतात.

आदित्य ठाकरे यांनी प्रोफाईलवरून मंत्रिपदाचा उल्लेख हटविला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र व युवा सेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर प्रोफाईलमध्ये बदल करून त्यातील मंत्रिपदाचा उल्लेख काढला आहे. हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट संकेत मानला जात आहे.

Eknath Shinde : ठाकरे सरकार धोक्यात; एकनाथ शिंदेंसोबतच्या आमदारांचा फोटो व्हायरल, स्वतंत्र गट स्थापन होणार!

शिवसेनेतील सुमारे दोन-तृतीयांश आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. सत्तेसाठी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाशी प्रतारणा करणार नाही, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतल्याने ते मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलेले उघड-उघड आव्हान मानले जात आहे.

शिवसेना संघर्ष करणारा पक्ष, जास्तीत जास्त काय होईल, सत्ता जाईल : संजय राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, “राज्यपालांना करोना झाला असल्याने काम थोडं धीम्या गतीने सुरु आहे. राज्यपालांना थोडं बरं वाटू द्या त्यानंतर कोणाकडे किती आमदार आहेत पाहूयात. उगाच जास्त उतावीळपणा नको. एकनाथ शिंदे आणि आमचे सर्व लोक पुन्हा स्वगृही परततील याची आम्हाला खात्री आहे.”

Governor Koshyari Covid Positive : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोना

आज उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट होणार असल्याचंही संजय राऊतांनी यावेळी सांगितलं. पुढे बोलताना “शिवसेना संघर्ष करणारा पक्ष आहे. जास्तीत जास्त सत्ता जाईल. सत्ता पुन्हा मिळू शकते, पण पक्षाची प्रतिष्ठा सर्वात वरती आहे.” असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

 

spot_img
Latest news
Related news