Maharashtra Weather News : सावधान ! राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा

एमपीसीन्यूज : पावसाने विश्रांती घेतल्यामुळे सांगली कोल्हापूरसह कोकणातील पूरग्रस्त भागातील जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच हवामान विभागाने पुन्हा या जिल्ह्यामंध्ये अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त जिल्ह्यामंध्ये पुन्हा यलो अलर्ट दिला आहे.

हवामान विभागाने २ ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे कोकणातील रायगड, रत्नागिरी तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, साताऱ्यासह राज्यात पुराच्या फटक्यातून सावरत असलेल्या अन्य जिल्ह्यांवर पुन्हा एकदा मुसळधार पावसाचे संकट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

आगामी काही दिवसांमध्ये हवामानातील बदलामुळे पुन्हा मुसळधार संकट ओढवू शकते, अशी सूचना हवामान विभागाने दिली आहे. गेल्या आठवड्यात पावसाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात थैमान घातले होते.

आता पुन्हा पावसाचा इशारा मिळाल्यानंतर संबंधित पूरग्रस्त जिल्ह्यातील यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.