Monsoon Update : पुन्हा एकदा मान्सून दमदार हजेरी लावणार, आज महाराष्ट्रभर कोसळणार सरी

एमपीसी न्यूज : मान्सूनचं (Monsoon) आगमन झाल्यानंतर राज्यात दमदार पावसाला सुरुवात झाली होती. पण जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईसह महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.

यानंतर आता जुलै महिन्यात पुन्हा एकदा मान्सून दमदार हजेरी लावेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. तत्पूर्वी आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावासाची शक्यता आहे. आज सकाळापासूनच राज्यात बहुतांशी ठिकाणी ढगाळ वातावरणाची नोंद करण्यात आली आहे.

अरबी समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे ३० जून पर्यंत प्रामुख्याने कोकण विभागात मध्यम सरींची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात जून अखेपर्यंत तुरळक ठिकाणीच हलक्या पावसाची शक्यता आहे. हवेच्या चक्रीय स्थितीमुळे झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, पूर्व मध्य प्रदेश या भागांमध्ये तसेच विदर्भाच्या काही भागांमध्ये २६ ते ३० जून दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटाचीही शक्यता आहे.

मान्सूनने १९ जूनपर्यंत देशाचा ९० टक्के भाग व्यापून टाकला. पण पुढे पोषक वातावरण मिळाले नाही. यामुळे मान्सूनचा प्रवास मंदावला. पावसाच्या तीव्रतेवर परिणाम झाला. ही परिस्थिती काही दिवस अशीच राहण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.