Pune: माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचं निधन

Maharashtra's Ex- CM Shivajirao Patil Nilangekar passes away शिवाजीराव पाटील-निलंगेकर हे 1985-86 या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री होते.

एमपीसी न्यूज- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर (वय 91) आज पहाटे सव्वा दोनच्या सुमारास किडनीच्या विकाराने निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु होते. या वयातही त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली होती. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुलगे, एक मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. भाजप नेते तथा माजी मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर हे त्यांचे नातू होत. त्यांच्यावर आज (दि.5) निलंग्यात अंत्यसंस्कार होणार आहेत.

शिवाजीराव पाटील-निलंगेकर हे 1985-86 या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात त्या आधी अनेक महत्त्वाच्या खात्यांचा कारभार सांभाळला होता.

निलंगेकर यांचा दि.16 जुलै रोजी लातूर येथील खासगी रुग्णालयात कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना पुण्याला हलवले होते.

या वयातही त्यांनी कोरोनावर मात केली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयातील नॉन कोरोना वॉर्डात दोन दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.