National wrestling tournament: राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राची महिला पैलवान प्रगती गायकवाडला कांस्यपदक

एमपीसी न्यूज – हरिद्वार येथे दिनांक १३ ते १५ नोव्हेंबर रोजी झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राची महिला पैलवान प्रगती गायकवाड हिने कास्यपदक मिळविले.

भारतीय कुस्ती महासंघाच्या वतीने देशातील टाॕप- १० कुस्तीगिर निवडून हरिद्वार येथे घेण्यात आलेल्या १७ वर्षाखालील ग्रॕन्ड प्रिक्स राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पैलवान प्रगती गायकवाड हिने भारत देशात ६१ किलो. वजनगटात तिसरा क्रमांकावर ( कास्यपदक ) आपले नाव कोरले. कास्यपदकाच्या पहिल्या लढतीत झारखंड ची महिला पै. सिमरन बिलिच्च हिस् चितपट केले. कास्यपदकाच्या अंतिम लढतीत हरियाणा ची महिला पै. स्वाती बर्रवाल हिच्या बरोबर झालेल्या अटीतटीच्या लढतीत पैलवान प्रगती हिने स्वाती हिस् पराभूत करून विजय मिळवून कास्यपदक मिळविले.

भाच्याशी गैरवर्तन करणाऱ्या मामीवर गुन्हा दाखल

पैलवान प्रगती गायकवाड ही पिंपरी चिंचवड शहराची महिला कुस्तीगिर असून तिने आॕगस्ट २०२२ मध्ये युरोप मध्ये बुल्गारिया देशात कुस्तीचे प्रशिक्षण घेतले असून सध्या मुंबई येथे भारतीय खेल प्राधीकरण ( साई ) येथे कुस्तीकोच पै. अजय लोधी , पै. अमोल यादव पै. कन्हैया यादव , महिला कुस्तीकोच प्रियांका सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहे. प्रगती सध्या १२ वी मध्ये शालेय शिक्षण घेत असून ती प्रेरणा ज्युनिअर काॕलेज निगडी पुणे ची विद्यार्थीनीं आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंतभाऊ गावडे, कार्याध्यक्ष आमदार महेश लांडगे, सरचिटणीस संतोष माचुत्रे, दिलीप बालवडकर, विशाल कलाटे, ज्ञानेश्वर कुटे, बबन बोऱ्हाडे, काळूराम कवितके, किशोर नखाते, अजय लांडगे, राजाभाऊ जाधव, धोडिंबा लांडगे, आदी जणांनी अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.