Pimpri : जलदिंडी प्रतिष्ठानच्या वतीने झुलेलाल घाटावर महाआरती 

एमपीसी न्यूज – जलदिंडी प्रतिष्ठानच्या वतीने पिंपरीतील झुलेलाल घाटावर मंगळवारी (दि. २) महाआरती होणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे राजीव भावसार यांनी दिली.
 
_MPC_DIR_MPU_II
पिंपरीतील झुलेलाल घाटावर संध्याकाळी सहा वाजता ही महाआरती होणार आहे. यावेळी पवना नदीचे पूजन व सिंधी समाजाचे दैवत बहराना साहेब यांचे पूजन होणार आहे. याबाबत महिती देताना जलदिंडी प्रतिष्ठानचे राजीव भावसार म्हणाले की, जलदिंडीची दशकपूर्ती होत आहे. नागरिकांचे नदीशी नाते जोडावे व नदीजवळ येऊन नदीच्या समस्या समजावून घेण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला आहे.  
 
यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, महापौर राहूल जाधव, जलदिंडीचे संस्थापक डॉ. विश्वास येवले, जलदिंडी प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित राहणार आहे. डॉ. विश्वास येवले यांचे नदी व जलदिंडी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या उपक्रमात अनेक सामाजिक संस्था सहभागी होणार आहेत. सर्व समाज बांधवानी उपस्थित राहावे, असे आवाहनही करण्यात आले. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1