Mahaseva Day : आळंदी नगरपरिषदेमध्ये 21 सप्टेंबर रोजी साजरा होणार महासेवा दिन

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र शासनाने प्रत्येक कार्यालयातील (Mahaseva Day) प्रंलबित संदर्भ, अर्ज, तक्रारी, सेवा यांचा निपटारा करण्यासाठी 17 सप्टेंबर 2022 ते 2 ऑक्टोबर 2022 या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा राबविण्याचे निश्चित केले आहे. या अनुषंगाने दिनांक 21 सप्टेंबर 2022 रोजी पुणे जिल्ह्यात ‘महासेवा दिन’ आयोजित करायचा असून तालुका स्तरावर आळंदी नगरपरिषदेच्या प्रत्येक विभागा अंतर्गत प्रंलबित अथवा नवीन सेवा पुरवण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

त्यामध्ये मालमत्ता हस्तांतरण नोंदी, नव्याने नळ जोडणी, जन्म मृत्यू दाखले, मालमत्ता उतारा, मालमत्ता कराची मागणी पत्र इ.सेवा पुरवण्याबाबत हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या महासेवा दिनाच्या निमित्ताने आळंदी नगरपरिषदेमध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत हा कार्यक्रम पार पडणार असून नागरिकांनी त्या कालावधीत सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहान नगरपषरिदेच्या वतीने मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी केले आहे.

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरावडा (Mahaseva Day) दिनांक 17 सप्टेंबर 2022 ते 2 ऑक्टोंबर 2022 या अनुषंगाने दिनांक 21 सप्टेंबर 2022 रोजी संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये महासेवा दिन साजरा करण्यात येणार आहे, याबाबतची माहिती आळंदी नगरपरिषद कार्यालयीन आधिकारी किशोर तरकासे यांनी दिली.

PCMC Job Recruitment : नोकर भरती! 386 पदांसाठी तब्बल 1 लाख 30 हजार अर्ज

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.