Pune News : महात्मा गांधी म्हणजे मानवी जीवनाला समृद्ध करणारे विचार देणारे तत्वज्ञ – मिलिंद जोशी

एमपीसी न्यूज : सध्या समाजात नैतिक आणि भौतिक जीवनात प्रचंड दरी निर्माण झाली आहे. ही दरी भरून काढण्यासाठी समाजाला महात्मा गांधींच्या विचारांची कास धरावी लागेल. गांधीनी केवळ स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व केलं नाही तर ते लेखक होते, नेटकं बोलणारे वक्ते होते.(Pune News) मानवी जीवनाला समृद्ध करणारे विचार देणारे तत्वज्ञ होते म्हणूनच त्यांचे विचार जगाने स्वीकारले गेले आहे. त्यांच्या विचारांची कास धरून वाटचाल करणे हीच त्यांना खरी आदरांजली आहे असे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यध्यक्ष मिलिंद जोशी यांनी सांगितले.

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने म. गांधींच्या 75 व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने “महात्मा गांधी विचार व छायाचित्र प्रदर्शन” सारसबागेजवळच्या बाळासाहेब ठाकरे कलादालनात भरवले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन जोशी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी ज्येष्ठ गांधीवादी उल्हासदादा पवार होते. माजी मंत्री व ज्येष्ठ नेते बाळासाहेब शिवरकर, म. गांधी विचार दर्शन प्रदर्शनाचे मुख्य आयोजक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड, नीता रजपूत, सुधीर काळे, राज गेहलोत, सचिन आडेकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

मिलिंद जोशी म्हणाले, आज लेखकांनी दुर्दैवाने विचार धारेचे झेंडे हातात घेतले आहेत. सत्य कुठल्याही भगवा, हिरवा, निळा, पिवळ्या, पांढ-या कुठल्याही रंगाचे नसते. (Pune News) ते डाव्याही बाजूचे नसते तसेच ते उजव्याही बाजूचेही नसत. कुठलीही बाजू घेता आली नाही म्हणून सत्य कधी मधला मार्ग स्वीकारत नाही. सत्य नेहमी अल्पमतात असते हे गांधीजींनीच सांगितलं आहे. तरीही सत्याचं मोल कधी कमी होत नाही.

Pune News : अग्रवाल समाज फेडरेशन गोल्डन क्लबतर्फे आयोजित आध्यात्मिक सहलीची सांगता

गांधीजींच्या साहित्यांच महत्व असं की अगदी साध्या, सरळ सोप्या शब्दात केलेली मांडणी. त्यांना एकदा पत्रकाराने इंग्रजीत विचाराले तुमच्या दृष्टीन गाय म्हणजे काय ? गाय म्हणजे कारूण्याची कविता असे उत्तर त्यांनी दिले होते. त्यांच्या लेखनात वाक्यात कधी आठवा किंव नववा शब्द सापडणार नाही. गांधीजींवर किमान एक लाख लोकांनी लेखन केलेले आहे. त्यांच्यावर चित्रपट निघाले, नाटकं निघाली, त्यांची समिक्षाही झाली पण सर्वांना हा महात्मा पुरून उरला. अशा गांधीजींच्या विचारांची आज समाजाला फार गरज आहे, असे त्यांनी शेवटी सांगितले.

ज्येष्ठ गांधीवादी नेते उल्हास पवार म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि त्यानंतर गांधीजींची हत्य माथेफिरूंनी केली. त्यामुळे एका डोळ्या हसू (आनंद) होता तर दुस-या डोळ्यात आसू (आश्रू) होते. आंबेडकरी चळवळीतील डॉ. रावसाहेब कसबे यांनी महात्मा गांधीवर “पराजित राजकारणी आणि अपराजित महात्मा” नावाचा ग्रंथ लिहिला आहे.

टेलिफोन, रेडिओ नसतानाच्या काळात गांधीजी जगभर पोचलेला हा महात्मा होता. त्यांची आत्मिक बल प्रचंड होते आणि त्यांनी सव्वाशे वर्षे जगण्याचा संकल्प केला होता.(Pune News) ते जगलेही असते पण दुर्दैवाने त्यांनी हत्या झाली. सन 1917 साली अवंतिका गोखले यांनी महात्मा गांधींवर पुस्तक लिहिले होते आणि त्याची प्रस्तावना लोकमान्य टिळकांनी लिहिली होती. देशात सलोखा आणि ऐक्य निर्माण करण्याचे स्वन्प महात्मा गांधी यांनी बघितले होते. ते पूर्ण करण्यासाठीच आज एक तरूण पदयात्रा करत आहे.

महात्मा गांधी विचार दर्शन व छायाचित्र प्रदर्शनाचे संयोजक अभय छाजेड यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, मार्टिन ल्यूथर किंग यांनी एके ठिकाणी म्हटले आहे की, तुम्ही आमच्याकडे मोहनदास गांधी पाठवलेत आणि आम्ही त्यांनी महात्मा करून परत पाठवले, पण दुर्दैवाने त्यांचा योग्य तो सन्मान राखला गेला नाही अशी खंतही व्यक्त केली आहे. गांधीजी हयात असतानाच 1924 साली त्यांचे चरित्र लिहिले गेले. त्यांनी स्वातंत्र्यासाठी अहिंसा, सत्याग्रह, असहकाराचा मार्ग दाखवला.

पुण्याशी त्यांचे जवळचे संबंध होते. अशा महात्मा गांधीबद्दल अपप्रचार करण्याचा वेग वाढत आहे. त्याला उत्तर म्हणून विचारवंत, लेखक वेगवेगळ्या ठिकाणी लिहित आहेत. (Pune News) आता या अपप्रचाराच्या विरोधाला काँग्रासच्या कार्यकर्त्यांनी उत्तर देणे आवश्यक आहे. त्यामुळे महात्मा गांधी विचारधारा यासारख्या प्रदर्शनातून कार्यकर्त्यांना खूपकाही महिती मिळू शकते, ती त्यांना मिळवावी आणि अपप्रचार खोडून काढावा असे आवाहन त्यांनी केले.  आभारप्रदर्शन नीत रजपूत यांनी केले.

या प्रदर्शनात महात्मा गांधींच्या जन्म दाखल्यापासून, त्यांचे बालपण मातापिता, त्यांची शाळेसह जीवनातील विविध प्रसंगांच, लोकमान्य टिळक आणि गांधीजी, सरहद्द गांधी, आचार्य कृपलानी, गोलमेज परिषद, लंडनवारी, आणि त्या वेळच्या काही वृत्तपत्रातील बातम्यांची कात्रणांची अशी सुमारे साठ छायाचित्रे लावण्यात आलेली आहेत. हे प्रदर्शन सोमवारपर्यंत (दि.30) सारसबागे जवळील ठाकरे कलादालनात सर्वांसाठी खुले रहाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.