Maharashtra : भाजपला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज, ठाकरे गटाला सर्वाधिक जागा मिळाल्याची चर्चा?

ठाकरे गट 21, राष्ट्रवादी 19 तर काँग्रेस 9 जागा लढवणार

एमपीसी न्यूज : राज्यात सत्ता गमवावी लागलेली महाविकास आघाडी अधिक मजबुतीनं एकत्र आली असून लोकसभेच्या जागावाटपाचा फॉर्मुला देखील ठरला आहे. (Maharashtra) लोकसभेच्या 48 जागांचे वाटप राष्ट्रवादी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांमध्ये झालं आहे. अन्य छोट्या पक्षांना लोकसभेची एकही जागा सोडण्यात आलेली नाही. घटक पक्षांना तिन्ही पक्ष आपापल्या कोट्यातून जागा सोडण्याची शक्यता आहे.

आगामी लोकसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवणार आहे. जागावाटप ठरवतानाच कार्यकर्त्यांच्या पातळीवर मनोमिलनासाठीही प्रयत्न सुरू झाले आहेत. कोण किती जागा लढवणार या बाबतचा फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे. या फॉर्मुल्यानुसार शिवसेना सर्वाधिक 21 जागा लढवणार आहे. त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस 19 तर, काँग्रेस 8 जागा लढणार आहे. वाटप झालेल्या 48 पैकी 4 ते 5 जागांबाबत अजूनही काही प्रमाणात मतभेद असल्यानं त्यावर पुन्हा चर्चा करून तोडगा काढला जाणार आहे.

Pimpri News : शहराच्या सांस्कृतिक क्षेत्राचा ‘पीसीइटी इन्फिनिटी 90.4 एफएम’ मानबिंदू ठरेल : ज्ञानेश्वर लांडगे

 

गेल्या काही निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी चांगले यश मिळाले. एकत्रीत लढल्यामुळे हे शक्य झाल्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत एकत्र लढण्याचे तिन्ही पक्षाचे ठरले असून जागावाटप देखील या बैठकीत निश्चित करण्यात आले. त्यानुसार मुंबई आणि उपनगरमधील लोकसभेच्या (Maharashtra) 6 जागांपैकी शिवसेनेला 4 तर उरलेल्या 2 जागांपैकी 1 राष्ट्रवादीला तर दुसरी काँग्रेसला दिली जाणार आहे. काँग्रेसने उत्तर मुंबई, तर राष्टवादी काँग्रसने ईशान्य मुंबई लढवावी हे देखील ठरले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.